सातारा : कोरोना संसर्गाचा वाढता धोका विचारात घेता जिल्हा प्रशासन व आरोग्य विभाग सतर्क झाले आहे. जिल्ह्यातील कोरोना लसीकरणाचा वेग आणखी वाढविण्याचा निर्णय नुकताच घेतला असून त्यासाठी आवश्यकतेनुसार लस उपलब्ध करण्याचे प्रयत्न सुरु झाले आहेत. जिल्ह्यात लसीकरणाची व्याप्ती 110 केंद्रावरुन 316 पर्यंत करण्यात आली आहे. जिल्ह्यातील वाढते रुग्ण कमी करण्यासाठी प्रशासन प्रयत्न करीत आहे. रुग्णांना आवश्यकता असणारे बेड, इंजेक्शन, रक्त याची माहिती आराेग्य विभागाकडून घेतली जात आहे. त्यावर उपयाययाेजना आखण्यात येत आहेत.
सातारा जिल्ह्यात रविवार अखेर 4664 रुग्ण उपचारार्थ दाखल आहेत. याबराेबरच काही नागरिक गृहविलगीकरण (हाेम आयसाेलेशन) किंवा संस्थामत्क विलगीकरणात दाखल आहेत. त्यांच्यासाठी आराेग्य विभागाने हेल्पलाईन क्रमांक जाहीर केले आहेत.
बेड मिळविण्यासाठी
सातारा जिल्ह्यात काेराेनाबाधितांसाठी रुग्णालयात उपलब्ध बेड तपासण्यासाठी
संकेतस्थळ - covid19satara.in असे आहे. तेथे जाऊन रुग्णांच्या नातेवाईकांना तालुकानिहाय माहिती मिळते. माहिती तपासातना शेवटचा अपडेट (तारीख व वेळ) कधीचा आहे ताे नक्की पाहावा.
सिव्हिल हाॅस्पिटल , सातारा 237827
सिव्हिल सर्जन, सातारा 238494
जिल्ह्यातील विविध खासगी रुग्णालयांत बेड उपलब्ध आहेत. रुग्णांच्या नातेवाईकांनी संकेतस्थळावर जाऊन बेड उपलब्धततेची माहिती घेऊनच संबंधित रुग्णालयांत न्यावे.
लसीकरण केंद्र
सातारा जिल्ह्यात एक एप्रिलपासून 45 वर्षांपुढील सर्वांचे लसीकरण सुरु झाले आहे. काेराेनाची वाढती रुग्णसंख्या नियंत्रणात ठेवण्यासाठी जास्ती जास्त नागरिकांचे लसीकरण हाेणे गरजेचे आहे.
लसीकरणासाठी नाेंदणी करणे आवश्यक आहे. https://selfregistration.cowin.gov.in/ या संकेतस्थळावर जा.
स्वतःचा माेबाईल क्रमांक टाकून आेटीपीची खात्री करा.
स्वतःची माहिती भरुन नाेंदणी करा.
लसीकरणासाठी अपाॅईटमेंट घ्या.
सातारा जिल्ह्यातील सर्व प्राथमिक आराेग्य केंद्रात (सार्वजनिक सुट्टी वगळून) सकाळी अकरा ते पाच यावेळेत नागरिकांना लस देण्यात येत आहे.
प्रत्येक तालुक्यातील उपकेद्रांत लसीकरणाची माेहिम सुरु आहे. ही माेहिम दरराेज नसून दिलेल्या ठराविक वारीच सुरु असते. (अधिक माहितीसाठी नजीकच्या प्राथमिक केंद्रात संपर्क साधावा)
याव्यतरिक्त जिल्ह्यातील खासगी रुग्णालयांमध्ये लस मिळत आहे. तेथे
ही लस 250 रुपयांना मिळते.
काेविड 19 चाचणी केंद्र
काेराेनाची लक्षणे जाणवल्यास त्याचा संसर्ग इतरांना हाेऊ नये यासाठी वेळेत चाचणी करुन घेणे अत्यंत महत्वाचे आहे. त्यामुळे महत्वाच्या चाचणी केंद्रांची यादी तुमच्यासाठी आणि तुमच्या नातलग उपयुक्त ठरु शकते.
क्रांतिसिंह नाना पाटील जिल्हा रुग्णालय , सातारा.
कस्तुरबा रुग्णालय , सातारा.
कृष्णा हाॅस्पिटल, क-हाड.
प्राथमिक आराेग्य केंद्र, गाेडाेली.
तालुक्यातील ग्रामीण आणि उपजिल्हा रुगणालय.
खासगी लॅबमध्ये RTPCR ची चाचणी आता केवळ 500 रुपयांत उपलब्ध आहे.
सातारकरांनाे! काेविड 19 ची चाचणी टाळू नका; आरटीपीसीआर चाचणी झाली स्वस्त
ब्लड बॅंक
सिव्हील रुग्णालय, सातारा 238586
माऊली बल्ड बॅंक 222031 , 222586
अक्षय बल्ड बॅंक 231731
कृष्णा रुग्णलाय, कराड 02164 241456
वेणुताई चव्हाण उपजिल्हा रुग्णालय , कराड 02164 222459
रेमडिसिव्हरचा तुटवडा
कोरोना संसर्गाचा वेग जिल्ह्यात वाढू लागला आहे. दररोज सरासरी 400 ते 500 रुग्ण कोरोनाबाधित आढळत आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील रुग्णालयांत पुन्हा कोरोनाबाधितांची संख्या वाढत आहे. परिणामी जिल्ह्यातील रेमडिसिव्हर इंजेक्शनची मागणीही वाढली आहे. त्यामुळे रेमडिसिव्हर इंजेक्शनचा जिल्ह्यात तुटवडा जाणवू लागला आहे. त्यामुळे रुग्णांच्या नातेवाईकांना इंजेक्शन मिळविण्यासाठी धावपळ करावी लागत होती. कोरोनाबाधितांची संख्या वाढत असताना त्याच्या उपचारामध्ये महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या या इंजेक्शनचा योग्य पुरवठा राहील, याकडेही प्रशासनाने लक्ष देणे आवश्यक आहे.
हाेम आयसाेलेशनसाठीचे महत्वाचे क्रमांक
हेल्पलाईन
1077
जिल्हा नियंत्रण कक्ष
02162 - 232175 , 232349
आपात्कालीन रुग्णवाहिका
108 आणि 102
काेराेना कंट्राेल रुम
02162 - 233025
वेणुताई चव्हाण उपजिल्हा रुग्णालय, कराड 02164 222459
काेराेनापासून दूर राहण्यासाठी नागरिकांनी लस घ्यावी. सातत्याने हात स्वच्छ धुवावेत, ताेंडावर मास्क लावावा, सामाजिक अंतर पाळावे, सॅनिटायझरचा वापर करावा.
शेखर सिंह , जिल्हाधिकारी , सातारा
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.