सातारा : कोरोनाच्या वर्षपूर्तीनंतरही सातारा जिल्ह्यात बाधित रुग्ण सापडण्याचे प्रमाण दिवसेंदिवस वाढू लागले आहे. ही कोरोनाची साखळी वेळेत तोडणे गरजेचे आहे. त्यासाठी कडक निर्बंध अथवा अल्प कालावधीसाठी लॉकडाउन हे दोनच पर्याय जिल्हा प्रशासनापुढे आहेत. याबाबतचा निर्णय घेण्यासाठी आज (शुक्रवार, ता. दोन) पालकमंत्र्यांच्या उपस्थितीमध्ये बैठक होऊन निर्णय घेतला जाणार आहे. पालकमंत्र्यांसह इतर लोकप्रतिनिधी लॉकडाउनसाठी आग्रही नाहीत. त्यामुळे सातारकरांना एप्रिलमध्ये कडक निर्बंधांना सामोरे जावे लागणार आहे, तरच कोरोनाची साखळी तुटणार आहे.
कोरोनाच्या संसर्गाला एक वर्ष पूर्ण झाले, तरी जिल्ह्यात बाधित रुग्ण सापडण्याचे प्रमाण कमी झालेले नाही. सध्या जिल्ह्यामध्ये कोरोनाचे रुग्ण पुन्हा वाढू लागलेले आहेत. शंभरच्या आत असलेल्या आकड्याने आता 300 पार केले आहे. त्यामुळे पुणे, मुंबईप्रमाणे साताऱ्याचीही लॉकडाउनच्या दिशेने वाटचाल सुरू झाली आहे. सध्या रात्रीचे आठ ते सकाळी सातपर्यंत संचारबंदी लागू आहे, तरीही कोरोनाचा संसर्ग कमी होत नसल्याचे चित्र आहे. काही गावांत अचानक मोठ्या प्रमाणात रुग्णसंख्या वाढत आहे. याला कारण सौम्य किंवा लक्षणे विरहित बाधित रुग्णांच्या संपर्कामुळे हा प्रसार आता होत असल्याचे वैद्यकीय अधिकाऱ्यांचे मत आहे. त्यामुळे चाचण्या वाढविण्यासोबत लसीकरणावर जिल्हा प्रशासनाने भर दिला आहे.
शासनाने एक एप्रिलपासून 45 वर्षांवरील सर्वांना कोरोनाची लस देण्याचा निर्णय घेतला आहे; पण सध्या 60 वर्षांवरील सर्व व इतर आजार असलेल्यांना लसीकरण केले जात आहे. त्यासाठीसुद्धा पुरेशा प्रमाणात लस उपलब्ध होत नाही. त्यामुळे कोरोना संसर्ग रोखण्यात अडचणी येत आहेत.
सध्या सातारा जिल्ह्यात दररोज 1400 च्यावर कोरोनाची चाचण्या होत आहेत. त्यापैकी 383 जण कोरोना बाधित सापडत आहेत. त्याचे प्रमाण 26.58 टक्के आहे. जिल्ह्याशी सर्वाधिक संपर्क पुणे व मुंबईशी आहे; पण दररोज पुण्याहून साताऱ्यात नोकरी आणि व्यवसायानिमित्त येणाऱ्यांचे प्रमाणही अधिक आहे. पुण्यात परिस्थिती दिवसेंदिवस गंभीर होत असताना संपर्काच्या माध्यमातून साताऱ्यातही रुग्णसंख्या वाढण्याची भीती आहे.
सध्या वाढती कोरोना रुग्णसंख्या लक्षात घेऊन जिल्हा प्रशासन शुक्रवारपासून (ता. दोन) निर्बंध अधिक कडक करण्याच्या तयारीत आहे. साखळी तोडण्यासाठी कडक लॉकडाउन हा पर्यायही प्रशासनापुढे आहे. त्यामुळे आज (शुक्रवार) पालकमंत्री बाळासाहेब पाटील, गृह राज्यमंत्री शंभूराज देसाई यांच्या प्रमुख उपस्थितीत सर्व लोकप्रतिनिधी व अधिकाऱ्यांची बैठक होणार आहे. यामध्ये एक अल्प कालावधीसाठी लॉकडाउन किंवा कडक निर्बंध लागले जाण्याची शक्यता आहे. सध्यातरी लॉकडाउन करण्यास बहुतांशी लोकप्रतिनिधींसह नागरिकांचा विरोध आहे. लॉकडाउन केल्यास अर्थ चक्रावर परिणाम होणार आहे. त्यामुळे कडक निर्बंध लावूनच कोरोनाचा संसर्ग रोखण्याचा पर्याय जिल्हा प्रशासनापुढे आहे.
प्रतिवर्षाप्रमाणे बावधनची बगाड यात्रा उत्साहात; प्रशासनाच्या नियमांना ठेंगा
काळजी घेण्याची आवश्यकता
सध्या संसर्ग होऊ नये म्हणून मास्क वापरणे, सामाजिक अंतर पाळणे, सॅनिटायझरचा वापर करणे या बाबींवर सर्वांनी भर देणे गरजेचे आहे; पण अनेक जण याकडे दुर्लक्ष करत आहेत. काही जण तर कुठला कोरोना... गेला आता... असे म्हणून संसर्ग वाढण्यास मदतच करत असल्याचे चित्र आहे. त्यामुळे अशा व्यक्तींमध्ये जागृती करून त्यांना कोविड संसर्ग रोखण्यासाठी उपाययोजना करायला भाग पाडले पाहिजे, तरच सातारकरांची कोरोनाच्या लॉकडाउनपासून मुक्तता राहील.
काेविड 19 रुग्णांच्या संपर्कातील लाेक जादा पैसे लागतात म्हणून Test करण्यास पुढाकार घेत नव्हते, आता RTPCR test अवघ्या किती रुपयांमध्ये हाेऊ शकते वाचा सविस्तर
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.