सातारा : कोरोना संसर्गाच्या वाढत्या प्रमाणामुळे लॉकडाउनच्या चर्चा पुन्हा सुरू झाल्या आहेत. लॉकडाउनच्या काळात मेटाकुटीस आलेल्या सर्वसामान्य व व्यापाऱ्यांच्या मनात त्यामुळे धस्स होत आहे; परंतु अशी परिस्थिती टाळणे सर्वस्वी आपल्याच हातात आहे. त्याचबरोबर प्रशासनानेही ढिलाई सोडून नियमांच्या पालनासाठी कंबर कसणे आवश्यक आहे.
कोरोना संसर्गाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी केंद्र शासनाने मार्च महिन्यात लॉकडाउन जाहीर केले. कधी नव्हे ते सर्वांनाच या गोष्टीला सामोर जावे लागले. त्याचा उद्योग व व्यवसायाला मोठा फटका बसला. सर्वांनाच मोठ्या आर्थिक नुकसानीला सामोर जावे लागले. अनेकांना आपल्या नोकऱ्या गमवाव्या लागल्या. व्यवसाय कोलमडले. तीन महिन्यानंतर निर्बंध हळूहळू शिथिल करण्यात आले, तरीही वेळेची बंधने होतीच. या सर्व परिस्थितीतून सावरत उद्योग व व्यवसाय आता पूर्ववत मार्गावर यायला लागले आहेत. कोरोना रुग्णांची संख्या कमी होत गेल्याने प्रशासनाचेही काही प्रमाण दुर्लक्ष झाले. नागरिकही आपली जबाबदारी विसरले. त्यामुळे गर्दी वाढत गेली. मास्क, सॅनिटायझरचे पालन करण्यात ढिलाई आली. त्याचा परिणाम साहजिकच कोरोनाचे रुग्ण वाढण्यात होत आहे.
राज्यातील विविध भागांप्रमाणे जिल्ह्यातही कोरोना रुग्ण वाढू लागले आहेत. त्याला रोखण्यासाठी राज्य सरकार व प्रशासनाकडून पुन्हा लॉकडाउनच्या हालचाली कराव्या लागतील असे सूचक इशारे दिले जात आहेत. पुन्हा लॉकडाउन कोणालाच नको आहे. त्यामुळे सर्वांच्या मनात लॉकडाउनची धास्ती वाढायला लागलेली आहे. पूर्ण लॉकडाउन कदाचित व्हायचे नाही; परंतु पुन्हा काही निर्बंध येण्याची शक्यता नाकारता येत नाही; परंतु ते टाळण्यासाठी सर्वांनी पूर्वीप्रमाणे नियमांच्या पालनाकडे गंभीरपणे लक्ष देण्याची आवश्यकता आहे.
काय बंधने येऊ शकतात
खबरदारी घेणे हाच उपाय
...याकडे हवे प्रशासनाचे लक्ष
Edited By : Siddharth Latkar
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.