सातारा : नोंद केलेल्या उसाची २० महिन्यांनी तोड

बहुतांश कारखान्यांकडून विलंब; तुरे आल्याने वजनातही घट होणार, शेतकरी चिंतेत
sugar cane workers
sugar cane workerssakal media
Updated on

काशीळ : अवेळी झालेला पाऊस, अनेक कारखान्यांची विस्कळित झालेली ऊस तोडणी यंत्रणा आदी कारणांमुळे ऊस उत्पादक शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. जानेवारीचा तिसरा आठवडा सुरू झाला असला तरी जिल्ह्यातील बहुतांशी कारखान्यांचा ऊस तोडणीचा कार्यक्रम अजूनही मागील वर्षाच्‍या जूनच्या पहिल्याच सप्ताहातील (२० महिन्यांनतर) सुरू असल्यामुळे ऊसतोड येण्यास विलंब होत आहे. उसाला मोठ्या प्रमाणात तुरे आल्याने वजनातही घट होणार आहे.

जिल्ह्यात यंदा ऊस गाळप हंगाम वेळेत सुरू झाला होता. दरासंदर्भात काही प्रमाणात ऊस आंदोलने झाली. मात्र, काही कारखान्यांनी पूर्ण एफआरपी, तर काही कारखान्यांनी ८०-२० फार्म्युला स्वीकारत ऊसबिले काढली आहेत. कोरोनामुळे भाजीपाला विक्रीतील निर्माण झालेल्या अडचणी, आले पिकाच्या दरातील घसरण तसेच इतर पिकांचे अस्थिर दर, पावसाचे वाढलेले प्रमाण यामुळे गेल्या दोन वर्षांत उसाच्या क्षेत्रात वाढ झाली आहे. माण, खटाव, खंडाळा, फलटण, कोरेगाव या दुष्काळी तालुक्यांत उसाच्या क्षेत्रात लक्षणीय वाढ झाली आहे. त्यामुळे या हंगामात गाळपासाठी मोठ्या प्रमाणात उसाचे क्षेत्र शिल्लक आहे. उत्पन्न वाढ व लवकर ऊस तुटावा, यासाठी आडसाली ऊस घेण्याकडे शेतकऱ्यांचा कल वाढला आहे.

sugar cane workers
अहमदनगर : आशुतोष काळे नशीबवान युवा नेते

ऊस हंगाम सुरू झाल्यावर अवेळी जोरदार पाऊस झाल्याने ऊस तोडणी यंत्रणा ठप्प झाली होती. पावसामुळे वाया गेलेले दिवस तसेच अनेक कारखान्यांची विस्कळित झालेल्‍या तोडणी यंत्रणेचा परिणाम दिसू लागला असून संथगतीने सुरू आहे. सध्या १६ पैकी १३ कारखान्यांचा गाळप हंगाम सुरू आहे. त्यातील बहुतांश कारखान्यांचा ऊस तोडणी कार्यक्रम जूनच्या दुसऱ्या सप्ताहातील सुरू आहे. त्यामुळे अजून मोठ्या प्रमाणात ऊस उभा आहे. पाऊस व विस्कळित यंत्रणेमुळे ऊस तोडणीस विलंब होत असल्याने उसाला तुरे येण्याचे प्रमाण वाढले आहे. त्यातून उसाच्या वजनात घट होण्याची भीती वाढल्याने ऊस उत्पादक शेतकऱ्यांची चिंता वाढली. ऊस लवकर तुटावा, यासाठी शेतकरी कारखान्यांच्या कार्यालयाचे उंबरे झिजवत आहेत. त्याचा फायदा घेत ऊस तोडणीसाठी शेतकऱ्यांकडून पैसे मागण्याचे प्रकार सुरू आहेत. एकूणच शेतकऱ्यांच्या अडचणींत वाढ झाली आहे. उसाचे क्षेत्र मोठ्या प्रमाणात शिल्लक असल्याने हंगामही लांबणार आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()