नगराध्यक्षपदाचा अर्ज भरल्यानंतर संपर्क क्षेत्राबाहेर गेलेले जाधव हे काही तासांतच स्वगृही परतले.
दहिवडी (सातारा) : राष्ट्रवादीचे (NCP) नवनिर्वाचित युवा नगरसेवक महेश जाधव यांनी केलेले बंड शमले असून, त्यांनी नगराध्यक्षपदाचा उमेदवारी अर्ज आज काढून घेतला. वरिष्ठांच्या सूचनेवरून त्यांनी उमेदवार मागे घेतली. या वेळी राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष बाळासाहेब सावंत उपस्थित होते.
महेश जाधव (Mahesh Jadhav) यांनी भाजपच्या (BJP) नगरसेवकांना सूचक व अनुमोदक करून अर्ज भरल्यामुळे नगराध्यक्षपदाच्या निवडीचा गुंता वाढला होता. महेश जाधव यांचे हे पाऊल सर्वांनाच बुचकळ्यात टाकणारे व पक्ष नेतृत्वाला धक्का देणारे होते. कारण त्यांचे दिवंगत आजोबा शामराव जाधव व वडील पतंगराव जाधव हे राष्ट्रवादीचे निष्ठावंत म्हणून ओळखले जातात.
मात्र, नगराध्यक्षपदाचा अर्ज भरल्यानंतर संपर्क क्षेत्राबाहेर गेलेले महेश जाधव हे काही तासांतच स्वगृही परतले. त्यांनी पक्षाचे नेते प्रभाकर देशमुख (Prabhakar Deshmukh) यांची भेट घेतली. चर्चेनंतर रुसवाफुगवा संपून मनोमिलन झाले. जाधव यांच्या माघारीने राष्ट्रवादीने सत्तेच्या दिशेने एक पाऊल टाकले आहे. आता अर्ज माघारी घेण्याच्या शेवटच्या दिवशी म्हणजेच उद्या (ता. ९) काय घडामोडी घडतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
आमच्या कुटुंबातील तीन पिढ्या राष्ट्रवादीशी एकनिष्ठ आहेत. गैरसमजातून झालेली चूक दुरुस्त झाली आहे. नेते प्रभाकर देशमुख यांच्याशी मी प्रामाणिक आहे.
- महेश जाधव, नगरसेवक, राष्ट्रवादी
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.