धक्कादायक! डोक्याचे केस धरून फरफटत नेत दलित महिलेसह अल्पवयीन मुलाला अमानुष मारहाण; साताऱ्यातील घटनेने संताप

महिलेच्या मुलासही मारहाण करत जातिवाचक शिवीगाळ केलीये.
Satara Crime News Atrocity Act
Satara Crime News Atrocity Actesakal
Updated on

म्हसवड : भरचौकात जातिवाचक शिवीगाळ करून महिलेस (Dalit Women) लाथांनी, उसाच्या व लाकडी दांडक्याने मारहाण करीत विनयभंग केल्याप्रकरणी पानवण (ता. माण) येथील चारपैकी दोन फरारी झालेल्या संशयितांस पोलिसांनी शोधून अखेर अटक केली.

याबाबत म्हसवड पोलिस (Mhaswad Police) ठाण्यातून मिळालेली माहिती अशी, पानवण येथील एकाने म्हसवड पोलिस ठाण्यात याबाबत तक्रार दिली होती. शनिवारी (ता. २६) सकाळी नऊच्या सुमारास पानवण येथील महालक्ष्मी खताच्या दुकानासमोर फिर्यादीची आई जनावरांसाठी कडवळ घेण्यासाठी दिलेले पैसे देवदास रोहिदास नरळे यास परत मागितले.

Satara Crime News Atrocity Act
Bedag : बाबासाहेबांच्या नावाची कमान पाडणाऱ्या गावात मोठा ठराव; विरोधात निकाल जाताच ग्रामसभेतून आंबेडकरी समाज पडला बाहेर

त्याचा राग मनात धरून देवदास रोहिदास नरळे, पिंटू ऊर्फ शांताराम रोहिदास नरळे, संतोष गोपाळ नरळे, जनाप्पा विठ्ठल शिंदे (सर्व रा. पानवण) यांनी संगनमत करून फिर्यादीच्या आईस डोक्याचे केस धरून फरफटत रस्त्यावर आणून मारहाण केली. यावेळी महिलेच्या मुलासही मारहाण करत जातिवाचक शिवीगाळ केली.

Satara Crime News Atrocity Act
Loksabha Election : लोकसभा निवडणुकीपूर्वीच मोठ्या हालचाली; काँग्रेस-भाजपात गेलेले 'हे' बडे नेते पुन्हा पक्षात परतणार?

याप्रकरणी म्हसवड पोलिस ठाण्यात चार जणांवर अॅट्रॉसिटीअंतर्गत गुन्हा (Atrocity Act) दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्यातील दोघांना पूर्वीच पोलिसांनी अटक केली होती. दोन फरारी संशयितांचा शोध सुरू होता.

Satara Crime News Atrocity Act
Highway Accident : आनंदाच्या क्षणीच काळाचा घाला! रक्षाबंधन करून परतताना अपघात; सहा वर्षांच्या चिमुरडीसह दाम्पत्य गंभीर

शोधादरम्यान, पोलिसांनी फरारी असणाऱ्या दोघांना अटक केली. या गुन्ह्यात आतापर्यंत चार जणांना अटक झाली आहे. दरम्यान, पानवण गावात कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. अधिक तपास सहायक पोलिस निरीक्षक राजकुमार भुजबळ करीत आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.