तारळे (सातारा) : मध्यंतरी झालेल्या ढगफुटीसदृश पावसाने (Heavy Rain) विभागाला अक्षरशः झोडपून काढले होते. त्यात ढोरोशी गावाच्या शेडसह स्मशानभूमीची (Dhoroshi Village Cemetery) धूळधाण झाली आहे. पाण्याच्या प्रवाहाने मोठी हानी झाली असून, अंत्यविधीचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. बोर्गेवाडी-घोट परिसरात झालेल्या पावसाने ओढ्यांना प्रचंड प्रमाणात पाणी आले. घोट भागातून येणारे सर्व ओढे ढोरोशी ओढ्याला येऊन मिळतात. त्यामुळे येथे ओढ्याच्या पाण्याला प्रचंड वेग असतो. पात्रही विस्तारले आहे. (Damage To Dhoroshi Village Cemetery Due To Heavy Rain Satara Marathi News)
मध्यंतरी झालेल्या ढगफुटीसदृश पावसाने विभागाला अक्षरशः झोडपून काढले होते. त्यात ढोरोशी गावाच्या शेडसह स्मशानभूमीची धूळधाण झाली आहे.
ढोरोशीकडून येणाऱ्या रस्त्याकडील नाल्यांनाही प्रचंड पाणी असते. हे सर्व पाणी ढोरोशीच्या स्मशानभूमीतून ओढ्याला मिळते. दरम्यान, ते स्मशानभूमीची खरडपट्टी काढतच पुढे जाते. हे पाणी ढोरोशीच्या स्मशानभूमीत घुसून नुकसान झाले. पाण्याच्या वेगवान प्रवाहाने तेथील रस्ता, शेडमधील पाया वाहून गेला आहे. शेडचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून, शेडमध्ये दगड गोटे व मातीचा राडारोडा पडला आहे.
शेडमध्ये जाणारा मार्ग पूर्णतः उद्ध्वस्त झाला आहे. त्यामुळे येथे अंत्यविधीचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. प्रशासनाने आपत्कालीन तरतूद करून येथील गैरसोय दूर करण्याची मागणी होत आहे. गेली काही वर्षे अतिवृष्टी होऊन तेथील स्मशानभूमीचे दरवेळी नुकसान होते. त्यामुळे येथे नव्याने दूरवर स्मशानभूमीत शेड बांधून पुराचा व पावसाचा परिणाम होणार नाही, याची काळजी घेणे आवश्यक आहे.
Damage To Dhoroshi Village Cemetery Due To Heavy Rain Satara Marathi News
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.