..तर 15 ऑगस्टला आत्मदहन करणार; दशरथ फुलेंचा सरकारला इशारा

कोरोनाच्या तिसऱ्या लाटेची शक्यता; सभापती रामराजेंच्या अध्यक्षतेखाली बैठक
Zirapwadi Rural Hospital
Zirapwadi Rural Hospitalesakal
Updated on

फलटण शहर (सातारा) : फलटण तालुक्यात कोरोनाच्या (Coronavirus) तिसऱ्या लाटेचा प्रादुर्भाव वाढण्यापूर्वी रुग्ण संख्येला वैद्यकीय उपचाराची सुविधा उपलब्ध करुन देण्यासाठी झिरपवाडी (ता. फलटण) येथील गिरवीरोडवरील जुन्या ग्रामीण रुग्णालयाच्या (Zirapwadi Rural Hospital) इमारत दुरुस्तीसाठी केलेले अंदाजपत्रक तातडीने मंजूर करावे व इमारत दुरूस्त करून घेऊन त्याचा वापर कोरोना उपचार केंद्रासाठी त्वरित वापर करावा, तसेच ही इमारत कायम वापरात आणावी, अन्यथा मुंबईतील मंत्रालय आवारात स्वातंत्र्य दिनी रविवार १५ ऑगस्ट रोजी जाहीर आत्मदहन करण्याचा इशारा सामाजिक कार्यकर्ते दशरथ फुले (Dasharath Phule) यांनी निवेदनाव्दारे दिला आहे.

Summary

दुसऱ्या लाटेत फलटणसह तालुक्याच्या ग्रामीण भागात कोरोना रुग्णसंख्या मोठ्या प्रमाणात वाढली. त्यामुळे अनेकांना वैद्यकीय सुविधा वेळेत न मिळाल्यामुळे आपल्या प्राणास मुकावे लागले.

फलटणातील गिरवी रोडवर झिरपवाडी ग्रामपंचायत हद्दीत ३० ते ३५ वर्षापूर्वी ८ ते १० एकर जागेत लाखो रूपये खर्चकरून रूग्णालय उभारण्यात आले. त्या वेळी सुसज्ज इमारत, आवश्यक वैद्यकीय साधने, सुविधा आणि पुरेसा अधिकारी/कर्मचारी वर्ग नियुक्त करण्यात आला असूनही रुग्णालय प्रत्यक्ष सुरु झाले नाही. त्यावेळच्या पार्श्वभूमीवर सन १९९७ मध्ये तत्कालीन राज्यपाल डॉ. पी. सी. अलेक्झांडर फलटण येथे आले असता सामाजिक कार्यकर्ते दशरथ फुले व त्यांच्या सहकाऱ्यांनी राज्यपालांची भेट घेऊन त्यांना ग्रामीण रुग्णालयाची शहर व तालुक्यातील सर्वसामान्यांना गरज आहे, त्यासाठी रुग्णालय उभे करुन सर्व साधने सुविधा अगदी आवश्यक डॉक्टर्स व अन्य अधिकारी कर्मचारी नियुक्त करुनही सदर रुग्णालय सुरु करण्यात येत नसल्याचे निदर्शनास आणून देत, ते तातडीने सुरु करण्याबाबत संबंधितांना सूचना देण्याची विनंती केली होती. त्यानंतर सदर ग्रामीण रुग्णालय सुरु झाले. मात्र, ते पूर्ण क्षमतेने कधीही सुरु करण्यात आले नाही आणि अखेर बंद करण्यात आले.

Zirapwadi Rural Hospital
"आगामी निवडणुका पूर्ण क्षमतेने लढा"

आज या ग्रामीण रूग्णालयाच्या इमारत दुरूस्तीसाठी दोन ते अडीच कोटी रूपये खर्च येणार असून जर रूग्णालय बंद पडले नसते, तर ही वेळ शासनावर आली नसती. करोनाची पहिली लाट सुरू झाल्यानंतर हे ग्रामीण रूग्णालय सुरू करावे, म्हणून पुन्हा मागणी केली. त्या वेळी झिरपवाडी येथील ग्रामीण रूग्णालयाच्या इमारतीत भागीदारी त्तत्वावर संसर्गजन्य आजारासाठी रूग्णालय उभारण्याबाबद विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक-निंबाळकर (Speaker Ramraje Naik-Nimbalkar) यांच्या अध्यक्षतेखाली ७ सप्टेंबर २० चे दरम्यान झालेल्या बैठकीत निर्णय झाला होता. या वेळी या बैठकीस आरोग्य मंत्री राजेश टोपे (Health Minister Rajesh Tope), आमदार दीपकराव चव्हाण, तसेच इतर अधिकारी उपस्थित होते. परंतु, सहा महिन्याचा कालावधी उलटून गेला, तरी अध्याप कोणत्याही निर्णय झालेला दिसून येत नाही. सातारा येथे जिल्हा कोविड व्यवस्थापन आढावा बैठक उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. त्यावेळी खासदार रणजितसिंह नाईक - निंबाळकर यांनी या ग्रामीण रूग्णालयाचा प्रश्न लावून धरला. त्यावेळी संबंधित अधिकाऱ्यांना हे रूग्णालय सुरू करण्यासाठी प्रयत्न करावेत, असा आदेश दिला. परंतु, दिड ते दोन महिन्याचा कालावधी होऊन गेला तरी कसलीही हालचाल झालेली दिसून येत नसल्याचे दशरथ फुले यांनी सांगितले.

Zirapwadi Rural Hospital
'कराड जनता'च्या कर्मचाऱ्यांचा इशारा
Zirapwadi Hospital
Zirapwadi Hospital

दुसऱ्या लाटेत फलटण शहर व तालुक्याच्या ग्रामीण भागात कोरोना रुग्णसंख्या मोठ्या प्रमाणात वाढली. त्यामुळे अनेकांना वैद्यकीय सुविधा वेळेत न मिळाल्यामुळे आपल्या प्राणास मुकावे लागले असून त्यांच्यासाठी शहरातील वैद्यकीय सेवा सुविधा पुरेशा नसल्याच्या पार्श्वभूमीवर वास्तविक प्रशासनाने सदर ग्रामीण रुग्णालय इमारतीची तातडीने दुरुस्ती करुन घेऊन तेथे कोरोना उपचार केंद्र तातडीने उभे करण्याची आवश्यकता होती. मात्र, गेले ७ ते ८ महिने केवळ त्याच्या दुरुस्ती देखभालीचे आराखडे, अंदाजपत्रक करण्यात येत असल्याचे सांगून सदर इमारत पुन्हा एकदा दुर्लक्षीत ठेवण्याचा प्रयत्न होत असल्याची शंका व्यक्त करीत सदर इमारतीसाठी करण्यात आलेले आराखडे, अंदाजपत्रक तातडीने मंजूर करुन सदर इमारतीत कोरोना उपचार केंद्र त्वरित सुरु करण्याची मागणी फुले यांनी केली आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढल्यामुळे आरोग्य यंत्रणा पूर्णपणे गडबडलेली आहे.

Zirapwadi Rural Hospital
काळ्या यादीची भीती दाखवून ठेकेदारांशी 'सेटलमेंट'

कोरोनाने आजारी असणाऱ्या रूग्णांना बेड, तसेच औषध उपचार वेळेत उपलब्ध न झाल्यामुळे अनेकांना आपल्या प्राणास मुकावे लागले आहे. शहरात असणाऱ्या खाजगी हॉस्पिटलमध्ये रूग्णांना मोठा आर्थिक ताण सहन करावा लागत असून ज्यांची परिस्थिती चांगली आहे. असे लोक या हॉस्पिटलचा आर्थिक ताण सहन करित आहेत. परंतु, सर्वसामान्य तसेच गोरगरीब कुंटुंबाला या हॉस्पिटलचा आर्थिक ताण सोसणे अशक्य आहे. यासाठी गोरगरीब रूग्णांना उपचार मिळण्यासाठी या शासकीय रूग्णालयाची आवश्यकता असल्याचे फुले यांनी या निवेदनात म्हटले आहे. तिसरी लाट मोठ्या प्रमाणात येण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. यासाठी रूग्णांना या जिवघेण्या आजारातून वाचविण्यासाठी तयारी करण्याची गरज आहे. सदर इमारत गेली २०/२५ वर्षे दुर्लक्षित राहिल्याने इमारतीची दारे, खिडक्या अज्ञाताने काढून नेल्या असून अन्य नुकसान झाले आहे. तथापि प्रशासनाने रुग्णालय इमारत तातडीने दुरुस्त करुन तेथे कोरोना उपचार केंद्र लगेच सुरु करावे, अन्यथा आत्मदहन करण्याचा इशारा दशरथ फुले यांनी दिला आहे. या निवेदनावर हणमंतराव शिरनामे, जयसिंग नाळे यांच्या सह्या आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.