अजित पवारांकडून उमेदवारी घेतली खरी; पण निष्ठावंत घार्गेच ठरले भारी

Ajit Pawar
Ajit Pawaresakal
Updated on
Summary

राष्ट्रवादीचे सैन्य दिवस-रात्र पळवून सुद्धा उशिरा पर्यटन सुरु केल्यानं 'सावज' कमीच हाताला लागली.

औंध (सातारा) : जिल्हा बँकेचा निवडणूक (Satara District Bank Election) कार्यक्रम जाहीर झाल्यापासून खटाव तालुका सोसायटी मतदारसंघातून (Khatav Taluka Society Constituency) मोठी चुरस निर्माण झाली होती. राष्ट्रवादीच्या (NCP) एका गटाकडून निमसोडच्या नंदकुमार मोरे (Nandkumar More) यांचे घोडे पुढे करीत औंधच्या राणीसाहेब गायत्रीदेवी पंतप्रतिनिधी (Gayatridevi) यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्याकडून मोरे यांची उमेदवारी मागितल्याची चर्चा होती. याउलट शरद पवार (Sharad Pawar) साहेबांचे निष्ठावंत समजले जाणारे माजी आमदार प्रभाकर घार्गे (Prabhakar Gharge) यांनी दोन वर्षांपूर्वी अचूकपणे ठराव घेण्यापासून निवडणुकीची तयारी केली होती. मात्र, गायत्रीदेवींचा दुसरा गट एका प्रकरणात अडचणीत सापडलेल्या घार्गेंना कोंडीत पकडण्याची एक ही संधी सोडली जात नव्हती.

शेवटी उमेदवारीच्या नाट्यमय घडामोडीनंतर धाकले पवार समर्थकांकडून पक्षाची अधिकृत उमेदवारी मोरे यांच्याकडे दिली गेली, तर प्रभाकर घार्गे साहेबांनी स्वाभिमानाची हाक देत थोरले पवार साहेब समर्थक म्हणून बंडखोरी केली. 'आमचं ठरलंय' टिमचे कॉंग्रेस नेते रणजितसिंह देशमुख (Ranjitsingh Deshmukh) व भाजप नेते डॉ. दिलीप येळगावकर (Dilip Yelgaonkar) या किंगमेकरांची खंबीर साथ लाभल्याने पत्नी इंदिराताई व कन्या प्रीती, प्रियंका घार्गे यांनी निष्ठावंत कार्यकर्त्यांच्या भक्कम फळीद्वारे घार्गेंचा दणदणीत विजयश्री खेचून आणला.

Ajit Pawar
राष्ट्रवादीच्याच संचालकाला अध्यक्षपदावर संधी

घार्गेंच्या उमेदवारीचा पत्ता कट करून गायत्रीदेवींनी निवडणुकीपूर्वीच अर्धा डाव जिंकला होता. सातारा-औंधसह पुसेगाव, खटाव, वडूज, मायणी, निमसोड, पुसेसावळी येथील राज्यकर्त्यांना राजकारणात आपल्या 'प्रमाण' शब्दाद्वारे धुरंदर राजकीय डाव-पेचांची यशस्वीता कित्येगदा औंधच्या राजवाड्यातून सिद्ध केली आहे. बँकेसाठी राष्ट्रवादीचे सैन्य दिवस-रात्र पळवून सुद्धा उशिरा पर्यटन सुरु केल्याने सावज कमीच हाताला लागली. उरलेली निष्ठावंत बदलू शकली नाहीत. आमच्या काही कार्यकर्त्यांनी प्रामाणिकपणे प्रयत्न केले नसल्याची खंतही मोरे यांनी व्यक्त केली. सर्व आयुधे वापरुनसुद्धा दहा मतांनी पराजय पत्करावा लागल्यामुळे बँकेत राणीसाहेबांना हार पत्कारावी लागली. राणीनं डाव जिंकला.. त्याऐवजी अन् राणीनं डाव हारला...' अशी राजकीय चर्चा तालुक्यातून व्यक्त होत आहे.

Ajit Pawar
'तिला' कर्करोग झाला अन् कुटुंबीयांनी असा काय निर्णय घेतला की..

फाट्यावरतीच.. अध्यक्षपदाचे दावेदार..

आमदार शशिकांत शिंदे व माजी आमदार प्रभाकर घार्गे या मास लिडर नेतृत्वांचा बँकेसह पक्ष वाढीसाठी उपयोग होऊ शकतो. मात्र, अंतर्गत कुरघोडीच्या राजकारणात आमदार शिंदेंचा 'करेक्ट' कार्यक्रम झाला. परंतु, अन्यायाला प्रतिकार करीत घार्गे यांनी स्वाभिमानाची हाक देत किंगमेकर मित्र व निष्ठावंत कार्यकर्ते यांच्या जोरावरती पलटवार करीत नंदकुमार मोरे यांचाच 'करेक्ट' कार्यक्रम केला. बालेकिल्ला राखण्यासाठी व पक्षाची विस्कटलेली घडी पूर्ववत करण्यासाठी पक्षप्रमुख शरद पवार साहेबांकडून निष्ठावंत घार्गे यांना अध्यक्ष-उपाध्यक्ष निवडीत न्याय दिला जाऊ शकतो का? याबाबतची शक्यता जाणकारांकडून आवर्जून व्यक्त केली जात आहे.

Ajit Pawar
'आमदार जयकुमार गोरे तटस्थ राहतील, अशी अपेक्षा होती; पण त्यांनी..'

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.