Satara Crime : रात्रीत असं काय घडलं? अख्खं कुटुंबच अंथरुणात मृत्युमुखी पडलं; साताऱ्यात हादरून सोडणारी घटना

वाल्मीक पठाराकडं जाणाऱ्या सणबूरच्या (Sanbur Village) गावकऱ्यांसाठी कालचा दिवस धक्कादायक उजाडला.
Sanbur Village Crime News
Sanbur Village Crime Newsesakal
Updated on
Summary

काही अपवाद वगळता येथील घरटी माणूस पोटापाण्यासाठी मुंबईत असून, माथाडी कामगारांची संख्या मोठी आहे.

ढेबेवाडी : वाल्मीक पठाराकडं जाणाऱ्या सणबूरच्या (Sanbur Village) गावकऱ्यांसाठी कालचा दिवस धक्कादायक उजाडला. गावातील एका निवृत्त शिक्षकासह त्याची पत्नी, मुलगा आणि विवाहित मुलगी असे चौघे जण अंथरुणातच मृत्युमुखी पडल्याची बातमी वाऱ्यासारखी गावात पसरली.

ही बातमी ऐकून घटनास्थळी धावलेल्या प्रत्येकाच्याच काळजाचा क्षणभरासाठी ठोका चुकला. या दुर्दैवी घटनेत एक अख्खं कुटुंबच संपलं आहे. ढेबेवाडी (Dhebewadi) खोऱ्याच्या एका टोकाला असलेलं सणबूर हे सुमारे साडेपाच हजार लोकवस्तीचं गाव मुंबईकरांचं गाव म्हणून संपूर्ण सातारा जिल्ह्याला परिचित आहे.

Sanbur Village Crime News
Kolhapur : आईचा टाहो, थिजलेला बाप अन् हादरलेलं शहर; आईसमोरच बसखाली सापडून पोटचा गोळा ठार

काही अपवाद वगळता येथील घरटी माणूस पोटापाण्यासाठी मुंबईत असून, माथाडी कामगारांची संख्या मोठी आहे. गावात सार्वजनिक गणेश मंडळांची संख्याही जास्त असून, गणेशोत्सवात जिवंत देखाव्यासाठी त्यांची पाटण तालुक्यात खासियत आहे. गुण्यागोविंदाने नांदणाऱ्या या गावात आज घडलेली घटना सणबूरसह संपूर्ण ढेबेवाडी खोरे हादरवणारी ठरली.

गावातील आनंदा जाधव यांच्या घरात त्यांच्यासह चौघांचा झालेला मृत्यू नेमका कोणत्या कारणानं झाला याबद्दलही अनेकजण निरनिराळे तर्कवितर्क व्यक्त करताना दिसले. सणबूर- रुवले रस्त्यापासून काही अंतरावर जाधव यांचं घर आहे. अन्य घरापासून एका बाजूला हे घर असून, तिथपर्यंत पोचायला निसरडी वाट आहे.

Sanbur Village Crime News
Kolhapur Gold Biscuits : तळ्याकाठी खेळताना मुलांना सापडली 24 लाख किमतीची सोन्याची बिस्किटे; 'त्यांना' सुगावा लागताच..

जाधव रयत शिक्षण संस्थेत सेवा बजावून निवृत्त झाले होते. इतिहास व मराठीचे अध्यापन ते करायचे. त्यांच्या पत्नी सुनंदा गृहिणी होत्या, तर मुलगा संतोष अविवाहित होता. पूर्वी हे कुटुंब आगाशिवनगर (मलकापूर, कऱ्हाड) येथे राहत होते.

काही वर्षापासून ते आपल्या मूळगावी सणबूरला राहण्यास आले होते. अलीकडे जाधव आजारी असल्याने त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू होते. उपचाराला अपेक्षित प्रतिसाद मिळत नसल्याने नातेवाईक व कुटुंबीयांनी काल त्यांना डिस्चार्ज घेऊन गावी आणले. रात्री लाइट नसल्याने जनरेटर तसेच मिनी ऑक्सिजन मशिनचीही व्यवस्था घरात केलेली होती.

Sanbur Village Crime News
मोठी बातमी! 50 वर्षांपासून धगधगत असलेला बेळगाव सीमाप्रश्‍न सुटणार? 'ग्रामविकास'नं मागवली सीमेलगतच्या गावांची माहिती

जाधव यांची विवाहित मुलगी पुष्पलता याही वडिलांच्या सोबतीला तेथे थांबल्या होत्या. मंद्रुळकोळे हे त्यांचे माहेर आहे. रात्री उशिरापर्यंत नातेवाइकांशी जाधव कुटुंबीयांचे तब्येतीबाबत बोलणे सुरू होते. सकाळी मात्र चौघांचाही मृत्यू झाल्याची घटना समोर आल्यानंतर नातेवाइकांसह ग्रामस्थांच्याही पायाखालची वाळू सरकली.

Sanbur Village Crime News
Sangli : इतिहासातील पहिलीच घटना! मिरजेत आंबेडकरांच्या नावाची पाडली कमान; पाटणकरांचा आंदोलनाचा इशारा

रात्री असे काय घडले, की अख्खं कुटुंबच अंथरुणात मृत्युमुखी पडलं? असा प्रश्न आज दिवसभर ढेबेवाडी विभागात एकमेकांना विचारला जात होता. अनेक अंदाज व तर्कवितर्क बांधले जात असले, तरी पोलिस तपासाअंतीच नेमके कारण समोर येईल. चौघांच्या पोटात गेलेले पदार्थ उत्तरीय तपासणीत काढून घेण्यात आले असून, त्याच्या अहवालानंतरच एकूण प्रकरणावर प्रकाश पडेल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.