Valmik Plateau : जंगलाने वेढलेल्या वाल्मीक पठारावरील कारळ्यात आढळला दुर्मिळ 'डेक्कन ग्राउंड गेको'

सरड्यासारखी शरीररचना असलेला दुर्मिळ डेक्कन ग्राउंड गेको (Deccan Ground Gecko) आढळून आला.
Deccan Ground Gecko
Deccan Ground Geckoesakal
Updated on
Summary

हा कीटकभक्षी आहे, कीटक, गांडुळे, फळमाशी, पतंग हे त्याचे खाद्य आहे. पडलेल्या पानाखाली, खडकांच्या फटीत, खोडावर गेको विश्रांती घेतात.

ढेबेवाडी : जंगलाने वेढलेल्या वाल्मीक पठारावरील (Valmik Plateau) कारळे- पोकळेवाडी (ता. पाटण) येथील एका घराच्या परिसरात पाल किंवा सरड्यासारखी शरीररचना असलेला दुर्मिळ डेक्कन ग्राउंड गेको (Deccan Ground Gecko) आढळून आला. कारळे- पोकळेवाडीतील कृष्णा साळुंखे यांना घराच्या परिसरात डेक्कन ग्राउंड गेको आढळला.

पाल किंवा सरड्यासारखी शरीररचना असलेला; परंतु अंगावरील पट्ट्यामुळे वेगळा भासणारा हा सरपटणारा प्राणी फारसा पाहण्यात नसल्याने श्री. साळुंखे कुटुंबीयांना त्याबद्दल औत्सुक्य वाटले. काही वेळातच तो नैसर्गिक अधिवासात स्वतःहून निघून गेल्याचे सांगण्यात आले.

Deccan Ground Gecko
Satara Tourism : पावसाळ्यात कास, बामणोली, ठोसेघरसह महाबळेश्वरातील हुल्लडबाज पर्यटकांवर राहणार पोलिसांचा वॉच

दरम्यान याबाबत माहिती देताना निसर्ग अभ्यासक डॉ. सुधीर कुंभार म्हणाले, ‘‘याला डेक्कन ग्राउंड गेको असे म्हणतात. याचे डोके मोठे अंडाकृती सुपारी एवढ्या व्यासाचे असते. डोळा मोठा दिसतो. डोळ्यावर पापण्या नसतात. त्याचे पाय लांब असतात. त्याच्या चॉकलेटी अंगावर आडव्या पट्ट्या असतात. हा निशाचर असून विषारी नाही. तो जंगलात राहतो.

हा कीटकभक्षी आहे, कीटक, गांडुळे, फळमाशी, पतंग हे त्याचे खाद्य आहे. पडलेल्या पानाखाली, खडकांच्या फटीत, खोडावर गेको विश्रांती घेतात. जगात गेकोच्या १८५० प्रजाती आढळतात. त्यातील ही प्रजाती फक्त पश्चिम घाटात आढळते. साप, पक्षी व काही सस्तन प्राणी त्यांचे शत्रू आहेत.

Deccan Ground Gecko
Tasgaon Accident : नातीच्या वाढदिवसाचा केक कापला अन्‌ काळाने घातला घाला; कार कालव्यात पडून एकाच कुटुंबातील 6 ठार

हा सरपटणारा दुर्मिळ प्राणी असून, प्रामुख्याने पश्चिम घाटात विशेषतः जंगल परिसरात आढळून येतो. भिंतीवर सरसर चढण्याची गेकोची क्षमता आहे. त्याचे अस्तित्व येथील समृद्ध जैवविविधतेचे आणखी एक उदाहरण आहे.

-डॉ. सुधीर कुंभार, निसर्ग अभ्यासक

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.