कऱ्हाडला एकवेळचा पाणी पुरवठ्याचा निर्णयापासून घुमजाव

बील मीटरप्रमाणे आकारण्यात येणार असल्याचे श्री. डाके यांनी स्पष्ट
कऱ्हाडला एकवेळचा पाणी पुरवठ्याचा निर्णयापासून घुमजाव
Updated on

कऱ्हाड : शहरात एकवेळ पाणी पुरवठ्याच्या (Water supply) निर्णया पासून मुख्याधिकारी रमाकांत डाके (Chief Ramakant Dake) यांनी घुमजाव केले. वाढता विरोध, निर्णय विरोधातील तयार झालेला जनक्षोभ लक्षात घेवून निर्णय मागे घेत दोन वेळचा पाणी पुरवठा कायम केला. मात्र त्यात दोन्हीवेळेला २५ टक्के पाणी कपातही होणार असल्याचे मुख्याधिकारी डाके यांनी सांगितले. त्याचवेळी एप्रिलपासून २४ तास पाणी योजनाही कार्यान्वीत करणार असून त्याचे बील मीटरप्रमाणे आकारण्यात येणार असल्याचे श्री. डाके यांनी स्पष्ट केले.

कऱ्हाडला एकवेळचा पाणी पुरवठ्याचा निर्णयापासून घुमजाव
लंबूजी ईशांतच्या प्रेमाचा किस्सा; बास्केट बॉलच्या मैदानातून फुलली प्रेम कहाणी

एकवेळ पाणी पुरवठ्याच्या निर्णयावरून कालपासून शहरात गोंधळ सुरू आहे. त्या विरोधात पहाटेपासून फ्लेक्स व्दार गांधीगिरी स्टाईलने नागरीकांनी निषेध केला.

कऱ्हाडडकर अन्याय सहन करणार नाहीत. कऱ्हाडचे सेवक आहात मालक नाही. पाणी पुरवठा योजनेला अचानक तोटा का झाला अशा आशयाचे एक सुज्ञ कऱ्हाडकर म्हणून फ्लेक्स लावून कऱ्हाडला एक वेळ पाणी पुरवठ्याचा निषेध करण्यात आला. शहरातील चौका चौकात निषेधाचे फ्लेक्स झळकले आहेत. शाहू, दत्त चौकासह शहरातील चौका चौकात लावलेल्या फ्लेक्सची चर्चा होती.

कऱ्हाडला एकवेळचा पाणी पुरवठ्याचा निर्णयापासून घुमजाव
नाशिक : वैद्यकीय विभागाला कोरोनाचा विळखा

त्याचवेळी एकवेळ पाणी पुरवठ्याच्या निर्णया विरोधात सकाळी अकराच्या सुमारास नागरीकांनी मुख्याधिकारी यांची भेट घेतली. त्यांच्या सोबत माजी नगरसेवक विजय वाटेगावकर, सौरभ पाटील, हणमंत पवार यांच्यासह गब्बर ग्रुपच्या सदस्यांचा त्यात समावेश होता. त्यांनी मुख्याधिकारी डाके यांच्यावर प्रश्नांचा भडीमार केला. प्रदीर्घ चर्चेनंतर मुख्याधिकारी डाके यांनी एकवेळच्या पाणी पुरवठ्याचा निर्णय मागे घेतल्याचे जाहीर केले. आलेल्या नागरीकांनाही त्यांनी पाणी कपातीचे आवाहन केले. मंगळवार (ता. ११) पासून नेहमी प्रमाणे दोन वेळेला पाणी पुरवठा होणार असल्याचे यावेळी श्री. डाके यांनी जाहीर केले. ते म्हणाले, दोन वेळचा पाणी पुरवठा केवळ ४५ मिनीट असणार आहे. दोन्ही वेळचा पाणी पुरवठ्यातून २५ टक्के पाणी कपात होणार आहे. त्यामुळे त्याचाही फायदा होणार आहे. त्यासह एप्रिलपासून २४ तास पाणी योजना सुरू करणार आहे. त्याचे मीटर प्रमाणे बील दिले जाणार आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()