उसाचा दर जाहीर करा आणि मगच तोडणी करा; शेतकरी संघटना

ऊसतोडणी करण्यापूर्वी दर जाहीर करावा, अशी मागणी पाटण तालुक्यातील शेतकरी संघटनांनी केली.
Farmer Organization
Farmer OrganizationSakal
Updated on

पाटण - यंदाचा गळीत हंगाम सुरू करण्यापूर्वी लोकनेते बाळासाहेब देसाई कारखान्याने शेतकऱ्यांची मागील एफआरपीची थकीत रक्कम १५ टक्के व्याजासह तत्काळ द्यावी. यंदा ऊसतोडणी करण्यापूर्वी दर जाहीर करावा, अशी मागणी पाटण तालुक्यातील शेतकरी संघटनांनी कारखान्याचे अध्यक्ष अशोकराव पाटील यांच्याकडे केली.

ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या अडचणींबाबत पाटण तालुक्यातील शेतकरी संघटना व कारखाना व्यवस्थापन यांच्यामध्ये कारखाना कार्यस्थळावर बैठक झाली. कारखान्याचे कार्यकारी संचालक सुहास देसाई, किसान मंच अध्यक्ष प्रशांत पाटील, युवा आघाडीचे उपजिल्हाध्यक्ष सूर्यकांत पाटणकर, बाळासाहेब देसाई, प्रभाकर देसाई, रवींद्र चौधरी, लक्ष्मण चव्हाण व शेतकरी उपस्थित होते. या वेळी शेतकरी संघटनांकडून कारखाना व्यवस्थापनाकडे ऊसतोड कामगार व वाहतूकदारांकडून शेतकऱ्यांची मोठ्या प्रमाणात अडवणूक केली जाते. शेतकऱ्यांकडून पैशाची मागणी केली जाते. वेळेत ऊस तोडला जात नाही त्यावरही कारखाना व्यवस्थापनाने निर्णय घ्यावा, अशी मागणी केली.

Farmer Organization
शासन मदतीचा अद्यादेश फाडून निषेध; 'रयत'कडून शेतकऱ्यांना जादा भरपाईची मागणी

अध्यक्ष पाटील यांनी सध्या साखर कारखाने आर्थिक संकटात असून, बाजारातील साखरेचे मूल्य व उत्पादन खर्च याचा ताळमेळ लागत नाही. कारखाना कार्यक्षेत्रातील ऊस बाहेरील कार्यक्षेत्रातील कारखान्यांकडे जात आहे, ही गंभीर समस्या आहे, असे सांगितले. कारखान्याची आर्थिक परिस्थिती बघूनच भविष्यात आम्ही निर्णय घेणार आहोत. मागील वर्षाची एफआरपी येत्या सात दिवसांत शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करणार आहोत. तालुक्‍यातील शेतकऱ्यांचे कोणतेही नुकसान होणार नाही, अशी ग्वाही दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.