Deendayal Yojana : 'दीनदयाळ'च्या कर्जास राष्ट्रीय बँकांचा नकार; दारिद्र्यरेषेखालील नागरिकांना मोठा फटका

जिल्ह्यातील पालिका, नगरपंचायतीच्‍या हद्दीत योजना सुरू करण्याचे आदेश आहेत.
Deendayal Antyodaya Yojana loan
Deendayal Antyodaya Yojana loanesakal
Updated on
Summary

जिल्ह्यातील नगरपंचायती, पालिकांना १० हजार लोकांना कर्ज वाटपाचे टार्गेट आहे.

कऱ्हाड : पालिकांच्या हद्दतील दारिद्र्यरेषेखालील नागरिकांसाठी केंद्र शासनाच्या दीनदयाळ अंत्योदय राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियान (Deendayal Antyodaya Yojana) सुरू आहे. त्या अभियानांतर्गत जिल्ह्यातील नगरपंचायती, पालिका परिसरातील गरिबांना कर्ज देण्यास राष्ट्रीयीकृत बँका (National Bank) नकार देत आहेत. त्यामुळे योजना अडचणीत आली आहे. जिल्ह्यातील नगरपंचायती, पालिकांना १० हजार लोकांना कर्ज वाटपाचे टार्गेट आहे. मात्र, त्यातील काहीच टार्गेट बँकांच्या नाकर्तेपणामुळे पूर्ण होताना दिसत नाही.

नकार घंटेची कारणे

जिल्ह्यातील पालिका, नगरपंचायतीच्‍या हद्दीत योजना सुरू करण्याचे आदेश आहेत. त्यासाठी शहरी भागातील प्रत्येक बचत गटाला फिरता निधी म्हणून दहा हजारांचे कर्ज, व्यावसायिक गटांना तीन लाखांपर्यंतचे कर्ज व बचत गटांना व्यावसायिक प्रकल्पासाठी तीन लाखांपर्यंतचे कर्ज दिले जाते. राष्ट्रीयीकृत बँका ते वाटप करतात. मात्र, त्या कर्जाला सध्या बँका नकार देऊ लागल्याने कठीण स्थिती झाली आहे.

Deendayal Antyodaya Yojana loan
कर्नाटक सरकार धोक्यात? राज्यातही आता एकनाथ शिंदे, अजितदादा तयार होणार; भाजप नेत्याच्या दाव्याने खळबळ

प्रशिक्षणासही मुकावे लागले

दोन वर्षांपूर्वी या योजनेंतर्गत शहरी भागातील दारिद्र्यरेषेखालील नागरिकांना टॅली कोर्स, होम डेकोरेशन फॅशन डिझाईनिंग, अकाउंटिंग, नर्सिंग कोर्स, एक्झिक्युटिव्ह सेल्स ॲण्ड फॅशन याही प्रशिक्षण दिले गेले होत. यंदापासून तेही बंद आहे.

अशी आहे योजना

केंद्र सरकारने राज्य शासनाच्या मदतीने दीनदयाल अंत्योदय योजना सुरू केली. त्यात पालिकांना महिला बचत गटांना स्थापण्याचे उद्दिष्ट दिले. त्यानुसार प्रत्येक बचत गटाला कर्ज स्वरूपात मदत केली. २०१८-१९ कालावधीत बचत गट स्थापन करून त्यांना किमान दहा हजार रुपयेप्रमाणे फिरता निधी उपलब्ध दिला होता. २०८-१९ मध्ये ३०० लाभार्थ्यांना कौशल्य प्रशिक्षण दिले.

Deendayal Antyodaya Yojana loan
विमानतळाच्यात इतिहासात पहिल्यांदाच असं घडलं! सांबरा विमानतळावरून तब्बल 'इतक्या' प्रवाशांचा विक्रमी प्रवास

पालिका, नगरपंचायतींचे उद्दिष्ट

  • सातारा - ३६११

  • कऱ्हाड - १०७८

  • फलटण - १०४२

  • वाई - ७२१

  • मलकापूर - ६३३

  • कोरेगाव - ४९४

  • म्हसवड - ४८२

  • लोणंद - ३७४

  • वडूज - ३५३

  • रहिमतपूर - ३५३

  • दहिवडी - ३१७

  • पाचगणी - २९८

  • पाटण - २७६

  • महाबळेश्वर - २६८

  • खंडाळा - १३७

  • मेढा - ९४

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.