दोन दिवसांपूर्वी साताऱ्यातील गणेश मंडळांनी रात्री बारानंतर मिरवणुकीत वाद्ये बंद केल्यास पहाटे सहापर्यंत आहे त्या जागीच थांबण्याचा निर्णय घेतला होता.
सातारा : गणेशोत्सव (Satara Ganeshotsav) विसर्जन मिरवणुकीत कोणत्याही मोठ्या ध्वनिक्षेपक यंत्रणांना परवानगी नाही. आवाजाची मर्यादा पाळत रात्री बारापर्यंतच वाद्ये वाजविता येतील. मात्र, नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कडक कारवाई केली जाईल, असा इशारा पोलिस उपअधीक्षक राजीव नवले (Rajeev Navale) यांनी गणेश मंडळांच्या (Ganesh Mandal) पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत दिला.