वाघनखांबाबत विनाकारण वाद निर्माण करणाऱ्यांच्या मेंदूचा शिंदेंनी गंज काढावा; फडणवीसांचा ठाकरेंवर निशाणा

विनाकारण वाद निर्माण करणाऱ्यांचा छत्रपती शिवाजी महाराजांनाही त्रास झाला. त्यांना संपवून छत्रपतींनी स्वराज्य उभे केले.
Devendra Fadnavis
Devendra Fadnavisesakal
Updated on
Summary

छत्रपतींनी जिजाऊंच्या शिकवणीतून सर्व समाजाला एक करून रयतेचे राज्य तयार केले. त्यामुळेच छत्रपतींना आपण युगपुरुष म्हणतो.

सातारा : विनाकारण वाद निर्माण करणाऱ्यांचा छत्रपती शिवाजी महाराजांनाही त्रास झाला. त्यांना संपवून छत्रपतींनी स्वराज्य उभे केले. त्याचप्रमाणे वाघनखांबाबत विनाकारण वाद निर्माण करणाऱ्यांच्या मेंदूला, बुद्धीला आलेली बुरशी व गंज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी काढावा, असे आवाहन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी केले.

फडणवीस म्हणाले, ‘‘ज्या वाघनखांनी छत्रपतींनी (Chhatrapati Shivaji Maharaj Wagh Nakh) स्वराज्यावर चालून आलेल्या अफजल खानाचा वध केला होता. जो चित्तथरारक प्रसंग आपण पिढ्यान् पिढ्या ऐकत आलो. त्या रणसंग्रामातील सर्वात महत्त्वाचे शस्त्र ही वाघनखे आहेत; परंतु देशातील काही लोकांचा विनाकारण वाद उपस्थित करण्याचा धंदाच आहे.

Devendra Fadnavis
'नकली वाघांना शिवाजी महाराजांच्या वाघनखांचं महत्त्व काय समजणार'; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंना सणसणीत टोला

या रोगाचा सामना छत्रपतींनाही करावा लागला होता; परंतु त्या सर्वांना संपवून छत्रपतींनी स्वराज्य उभे करून दाखविले. मुनगंटीवारांनी वाघनखे मुख्यमंत्र्यांना दिली आहेत. त्यातून ज्यांच्या बुद्धीला बुरशी आलीय, गंज चढलाय, तो काढण्याचे काम मुख्यमंत्री करतील.’’

Devendra Fadnavis
विशाळगडावर आम्ही हिंदू-मुस्लिम एकोप्याने राहतो, पण..; मुश्रीफांना दंगलीची माहिती देताना मुस्लिम बांधवांना अश्रू अनावर

छत्रपतींनी जिजाऊंच्या शिकवणीतून सर्व समाजाला एक करून रयतेचे राज्य तयार केले. त्यामुळेच छत्रपतींना आपण युगपुरुष म्हणतो. त्यांचे नाव घेतल्यावर प्रत्येकाचे रक्त सळसळते हा त्यांचा करिष्मा आहे. या ठिकाणी त्यांच्या शौर्याचे प्रतीक असलेली वाघनखे आहेत. सर्व नागरिकांनी त्यापासून प्रेरणा घ्यावी, असे आवाहनही श्री. फडणवीस यांनी केले.

राज्यात मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वाखालील राज्य हे छत्रपतींची प्रेरणा घेऊनच चालले आहे. छत्रपतींप्रमाणेच शेवटच्या घटकासाठी, प्रत्येकाच्या उत्थानासाठी प्रयत्न करेल, असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.