खंडोबा देवाची यात्रा रद्द; देवराज पाटलांची मिरवणुकीस परवानगीची मागणी

खंडोबा देवाची यात्रा रद्द; देवराज पाटलांची मिरवणुकीस परवानगीची मागणी
Updated on

उंब्रज (जि. सातारा) : महाराष्ट्र, कर्नाटक व आंध्र प्रदेश येथील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या पाल (ता. कऱ्हाड) येथील 25 जानेवारीस होणारी श्री खंडोबा देवाची यात्रा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर रद्द करण्यात आली आहे. श्री खंडोबा देवाच्या यात्रेतील धार्मिक विधी, पूजाअर्चा, रूढी परंपरेनुसार करण्यात येईल. मात्र, जिल्हाधिकाऱ्यांच्या निर्देशानुसारच या वर्षी यात्रा पार पडेल, अशी माहिती प्रांताधिकारी उत्तम दिघे यांनी दिली.
 
यात्रेच्या अनुषंगाने आयोजिलेल्या नियोजन बैठकीत ते बोलत होते. देवस्थानचे प्रमुख मानकरी देवराज पाटील बैठकीच्या अध्यक्षस्थानी होते. अतिरिक्त पोलिस उपअधीक्षक डॉ. रणजित पाटील, अतिरिक्त तहसीलदार जनार्दन कासार, आपत्ती व्यवस्थापनाचे देविदास ताम्हाणे, अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी सचिन पाटील, गटविकास अधिकारी आबासाहेब पवार, उंब्रज पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक अजय गोरड आदींची प्रमुख उपस्थिती होती.

सिंहासनचा दिगू चिटणीस आणि गेम ऑफ थ्रोन्स!
 
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर भाविकांची सुरक्षितता महत्त्वाची असून, यात्रा कालावधीत 10 ते 15 जानेवारीपासून सतर्क राहायचे आहे. या कालावधीत कोणतीही स्टॉल गाडी लावून द्यायचे नाहीत. याची सर्वस्वी जबाबदारी यात्रा समितीची राहणार आहे. पाल येथे भाविक येऊ नये, यासाठी सुमारे आठ ते दहा किलोमीटरच्या सर्कलमधील परिसरात सील करण्यात येणार असल्याचे प्रांताधिकारी दिघे यांनी सांगितले. तथापि, या निर्णयावर जिल्हाधिकारी पुढील आढावा बैठकीत निर्णय देतील, अशी माहिती प्रांताधिकारी दिघे यांनी दिली. पोलिस उपअधीक्षक डॉ. रणजित पाटील यांनी श्री खंडोबा देवाचे भाविकांना ऑनलाइन दर्शन व्हावे, यादृष्टीने इंदोली फाटा, काशीळ येथे यात्रा समितीने मोठी स्क्रिन बसवून ऑनलाइन दर्शनाची सोय करावी, अशी सूचना केली. बैठकीस संजय काळभोर, बाबासाहेब शेळके, मंगेश कुंभार, संजय गोरे, सचिन लवंदे, यात्रा समितीचे पदाधिकारी, ग्रामस्थ उपस्थित होते. देवराज पाटील यांनी प्रास्ताविक केले. सह्याद्रीचे संचालक सर्जेराव खंडाईत यांनी आभार मानले. 

बहिणीवर बलात्कारप्रकरणी पाटण तालुक्‍यातील एकास सक्तमजुरीची शिक्षा 

मिरवणुकीस परवानगी द्यावी 

जिल्हा प्रशासनाने कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पाल यात्रेबाबत घेतलेला निर्णय योग्य आहे. मात्र, पाल यात्रेचा मुख्य सोहळा खंडोबा म्हाळसा यांचा विवाह हा असून, खंडोबा देवाच्या लग्न सोहळ्यासाठी येणारी वऱ्हाडी व मानकरी मंडळी व ट्रॅक्‍टरच्या साह्याने लग्न सोहळ्यासाठी निघणारी मिरवणूक ही काही मोजक्‍या मानकऱ्यांच्या उपस्थितीत काढण्यासाठी प्रशासनाने परवानगी द्यावी, अशी मागणी देवराज पाटील यांनी केली.

गोंदवलेकर महाराज पुण्यतिथी उत्सवास प्रारंभ; भाविकांसाठी दाेन दिवस राहणार मंदिर बंद 

Edited By : Siddharth Latkar
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.