सेनेच्या प्रयत्नानंतर चारा छावणी घोटाळा प्रकरणी गुन्हा दाखल हाेणार?

सेनेच्या प्रयत्नानंतर चारा छावणी घोटाळा प्रकरणी गुन्हा दाखल हाेणार?
Updated on

दहिवडी (जि. सातारा) : चारा छावणीतील घोटाळ्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्याचा आदेश दहिवडी न्यायालयाचे प्रथम वर्ग न्यायदंडाधिकाऱ्यांनी दहिवडी पोलिसांना दिला. माण-खटाव तालुक्‍यातील चारा छावण्यांमध्ये भ्रष्टाचार झाल्याबाबत शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख संजय भोसले यांनी आवाज उठवला होता. त्यांच्या तक्रारीची कोणीही दखल घेतली नाही.
 
त्यामुळे त्यांनी दहिवडी येथील प्रथम वर्ग न्यायदंडाधिकाऱ्यांच्या न्यायालयात माणच्या तहसीलदार बाई माने, मंडलाधिकारी नंदकिशोर महाडिक, तलाठी युवराज बोराटे, ग्रामसेवक नितीन सोनवलकर, कृषी सहायक शिवाजी गावडे, बिजवडीच्या विकास सेवा सोसायटीचे अध्यक्ष यशवंत शिनगारे व सचिव विकास भोसले यांच्यावर गुन्हे दाखल करण्यासाठी तक्रार दाखल केली होती.

या तक्रारीची दखल घेत न्यायदंडाधिकारी अमितसिंह मोहने यांनी शनिवारी  (ता. 6) यशवंत शिनगारे व विकास भोसले यांच्यावर गुन्हा दाखल करण्याचा आदेश दहिवडी पोलिसांना दिला. तर, तक्रारीतील इतर सर्वजण सरकारी नोकर असल्याने कलम 197 अन्वये या प्रकरणाच्या तपासामध्ये त्यांचा प्रत्यक्ष, अप्रत्यक्ष काही संबंध दिसून आल्यास त्यांच्या वरिष्ठ कार्यालयांची परवानगी घेऊन त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात यावा, असेही आदेशात म्हटले आहे. संजय भोसले यांच्याकडून ऍड. नितीन गोडसे व ऍड. मिनेश पाटील यांनी काम पाहिले.

Mahashivratri 2021 : श्री क्षेत्र महाबळेश्वर देवस्थान ट्रस्टने जाहीर केला महत्वपुर्ण निर्णय

Inspirationalwomenstories : भारताच्या राष्ट्रीय पक्षाची आई माहितीय?, ती करतेय आयुष्यभर मुक्याप्राण्यांचा सांभाळ

सात वर्षाच्या तुनजाने वडिलांना वाचवले; आजीसह भाऊ वाहून गेला

धक्कादायक! शिंगणापूरात चाे-या; ग्रामस्थांत खळबळ

आयुष्यात एकदाच असा क्षण येताे; नेटिझन्सकडून संदेशासह मिम्सचा पाऊस

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.