Good News : रॅपिड सर्व्हेमुळे दहिवडीत कोरोना रुग्णांची साखळी तोडण्यात यश

Good News : रॅपिड सर्व्हेमुळे दहिवडीत कोरोना रुग्णांची साखळी तोडण्यात यश
Updated on

दहिवडी (जि. सातारा) : प्रशासनाने उचललेल्या कठोर पावलांना नागरिकांनी साथ दिल्यामुळे कोरोनाबाधितांची साखळी तोडून कोरोनावर विजय मात करण्यात दहिवडीकरांना यश आले आहे. मागील महिनाभरात दहिवडीकरांनी अक्षरश: जेरीस आणले होते. एकाएकादिवशी बाधितांचे समोर येणारे आकडे धडकी भरवत होते. नागरिक भीतीच्या छायेखाली वावरत होते, तर प्रशासन चिंताग्रस्त झाले होते. सततच्या लॉकडाउनमुळे व्यापाऱ्यांचा व्यापार बसला होता. संपूर्ण शहर कंटेनमेंट झोन केले. रस्ते बंद केले तरी दिवसागणिक वाढणारी बाधितांची संख्या सर्वांनाच बधिर करत होती.
 
मात्र, एका दिवसात केलेल्या विक्रमी रॅपिड सर्व्हेमुळे संशयित शोधले गेले. प्रशासनाने घातलेल्या कडक निर्बंधांमुळे नागरिकांचा संपर्क थांबला गेला. रस्ते बंद केल्यामुळे बाहेरील लोकांचा शहराशी संपर्क रोखला गेला. या सर्व उपाययोजनांमुळे कोरोनावर नियंत्रण मिळविण्यात प्रशासनाला यश आले. सध्या शहरात काल व आज प्रत्येकी एक कोरोनाबाधित आढळला आहे. मागील कोरोनाबाधितांपैकी फक्त तीन जणांवर उपचार सुरू आहेत. बाकी सर्व बाधित बरे झाले आहेत. शहरातील कोरोनाचा प्रसार रोखण्यात यश आले आहे.
 
नगराध्यक्ष धनाजी जाधव म्हणाले, ""आम्ही केलेल्या आवाहनाला नागरिकांनी प्रतिसाद दिला. त्यामुळेच मोठ्या प्रमाणात कोरोनाबाधित सापडूनही अल्पावधीतच आम्ही कोरोनावर नियंत्रण मिळवले आहे.'' 

"सर्वांच्या सहकार्यामुळेच कोरोनावर नियंत्रण मिळविणे शक्‍य झाले आहे. मात्र, तरीसुद्धा नागरिकांनी निष्काळजीपणे वागू नये. प्रशासनाने दिलेल्या सूचनांचे पालन करावे. स्वतःसह इतरांच्या आरोग्याची काळजी घ्यावी असे आवाहन प्रांताधिकारी
शैलेश सूर्यवंशी यांनी केले आहे.

जिल्हा परिषद शाळेतील शिक्षकांनी केला गुन्हा कबूल; न्यायालयाने ठाेठावली शिक्षा 

Edited By : Siddharth Latkar

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()