बाप हा बापच असतो... बिबटयापासून वाचवले पोटच्या गोळ्याला

किरपेतील धनंजय देवकरांनी जिवाची बाजी लावून बिबट्यापासून वाचवले पोटच्या गोळ्याला
Leopard
Leopard sakal
Updated on

कऱ्हाड : किरपे (ता. कऱ्हाड) येथील शिवारात काल सायंकाळी बिबट्याच्या तावडीतून एका बापाने आपल्या मुलाला मोठ्या हिमतीने वाचवले आहे. डोळ्यादेखत पोटच्या गोळ्याला जबड्यात धरून बिबट्या घेऊन जाताना स्वतः जिवाची बाजी लावून प्रतिकार करत मोठ्या धाडसाने बिबट्याचे पाय ओढून मुलाला वाचविणाऱ्या जिगरबाज बापाचे नाव आहे धनंजय देवकर. त्यांनी मोठ्या धैर्याने मुलाचा वाचवलेला जीव हा सातारा जिल्ह्यात चर्चेचा विषय ठरला आहे. त्यांच्या धाडसाचे कौतुक होत आहे.

Leopard
येमेन : सौदीचा तुरुंगावर हवाई हल्ला; ७० हून अधिक मृत्यूमुखी

किरपे येथील धनंजय देवकर हे मुलगा राज यांच्यासह काल दुपारनंतर ‘पाणारकी’ नावाच्या शिवारात गेले होते. त्याठिकाणी वांगी तोडल्यानंतर धनंजय इतर साहित्य पिशवीमध्ये भरत होते, तर राज त्यांच्या नजीकच खेळत होता. खाली पडलेली वांगी कापायची कात्री तो वडिलांना देताना अचानकपणे उसाच्या फडातून पाठीमागून येऊन बिबट्याने राजवर हल्ला चढवला. राजची मान जबड्यात पकडून बिबट्या त्याला फरफटत नेत होता. हे डोळ्यादेखत घडताना बाप म्हणून धनंजय यांनी दाखवलेले शौर्य नावाजण्याजोगे आहे. धनंजय यांनी जिवाची बाजी लावून बिबट्याच्या मागे धाव घेतली. त्यांनी राजला सोडवण्यासाठी आरडाओरडा करण्यासह त्याचा पाठलाग केला.

बिबट्या राजला ओढत तारेच्या कुंपणापर्यंत गेला. त्याचदरम्यान धनंजय यांनी बिबट्याचा पाय पकडला, तरीही बिबट्या पुढेच जात होता. बिबट्या कुंपणाला धडकल्यामुळे तो पडला. त्याचदरम्यान धनंजय यांनी ओढून राजला पकडले. त्यामुळे बिबट्याने राजची मान सोडून स्वतः तेथून पसार होण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर तो कुंपणाच्या पलीकडे गेला. त्यानंतर पुन्हा तो राजला पकडण्यासाठी पाठीमागे आला. त्यानंतर मोठ्या निकराने धनंजय यांनी त्याचा प्रतिकार केला. त्याचदरम्यान जिवाची बाजी लावून पोटच्या गोळ्याचा जीव वाचवल्यानंतर राज रक्तबंबाळ झाला होता. त्यांनी टॉवेल राजच्या मानेवर ठेऊन त्याला तेथील ग्रामस्थांच्या मदतीने कऱ्हाडच्या कृष्णा हॉस्पिटलमध्ये दाखल केले. तेथे त्याच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत. त्याला मोठी दुखापत झाली आहे.

Leopard
अतिवृष्टीग्रस्तांकडे गांभीर्याने लक्ष द्या; वेण्णा पूरग्रस्त समितीची जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी

बिबट्याने माझ्या समोरच राजवर हल्ला केला. तो जबड्यातून राजला घेऊन जाताना मी त्याचे पाय ओढून त्याचा प्रतिकार केला. त्यानंतरही तो पुन्हा राजला फरफटत घेऊन जाताना त्याच्यापाठीमागे धावून त्याला वाचवण्यासाठी प्रयत्न केले. बिबट्या कुंपणाला धडकून खाली पडल्यावर त्याने राजची माने सोडली. त्यानंतर मी त्याला कृष्णा हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल केले आहे.

- धनंजय देवकर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.