कडक सॅल्यूट! भारतीय संरक्षण दलात धनश्री सावंत बनल्या सातारा जिल्ह्यातून पहिल्या महिला कर्नल

भारतीय संरक्षण दलात २००२ मध्ये धनश्री सावंत यांची निवड झाली.
Dhanashree Sawant Indian Defense Force
Dhanashree Sawant Indian Defense Forceesakal
Updated on
Summary

प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर त्यांनी अरुणाचल, तेजपूर, बारामुल्ला, उरी, श्रीनगर, जयपूर, गुवाहाटी, अहमदाबाद, दिल्ली आदी विविध ठिकाणी उत्कृष्टरीत्या कामगिरी बजावली.

कोरेगाव : भारतीय संरक्षण दलामध्ये (Indian Defense Force) सातारा जिल्ह्यातून पहिल्या महिला कर्नल होण्याचा बहुमान लिंब (ता. सातारा) येथील धनश्री देविकीरण सावंत-जगताप (Dhanashree Sawant) यांनी मिळवला आहे. नुकतीच त्यांची कर्नलपदी पदोन्नती झाली आहे. त्या सध्या दिल्लीत कार्यरत आहेत.

भारतीय संरक्षण दलात २००२ मध्ये धनश्री सावंत यांची निवड झाली. त्यानंतर त्यांनी चेन्नईतील ऑफिसर्स ट्रेनिंग अॅकॅडमीमधून यशस्वीरीत्या प्रशिक्षण पूर्ण केले. प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर त्यांनी अरुणाचल, तेजपूर, बारामुल्ला, उरी, श्रीनगर, जयपूर, गुवाहाटी, अहमदाबाद, दिल्ली आदी विविध ठिकाणी उत्कृष्टरीत्या कामगिरी बजावली.

Dhanashree Sawant Indian Defense Force
MPSC Exam : दोनवेळा अपयश, तिसऱ्या प्रयत्नात यश! बोरगावच्या पूजा वंजारी 'एमपीएससी'त मुलींमध्ये प्रथम

भारतीय लष्करासाठी लागणाऱ्या इमारती, विविध प्रकारची बांधकामे, दुरुस्त्या, रस्ते, पूल व संरक्षण दलांतर्गत भूसेना, नौसेना, वायुसेनेसाठी आवश्यक कर्तव्य त्या करत असताना त्यांच्या एकूणच उत्कृष्ट कामगिरीची दखल घेत नुकतीच त्यांना कर्नलपदी पदोन्नती मिळाली आहे.

धनश्री सावंत यांचे नर्सरी ते दहावीपर्यंतचे शिक्षण सातारा येथील सातारा इंग्लिश मीडियम स्कूल, उच्च माध्यमिक शिक्षण लाल बहादूर शास्त्री कॉलेजात झाले. त्यांनी सातारा येथील कर्मवीर भाऊराव पाटील इंजिनिअरिंग कॉलेजमधून सिव्हिल इंजिनिअरिंगची पदवी विशेष प्रावीण्यासह संपादन केली आहे.

Dhanashree Sawant Indian Defense Force
राज्यसेवा परीक्षेत शेतकरी कुटुंबात जन्मलेल्या पोरानं राज्यात पटकावला प्रथम क्रमांक; उपजिल्हाधिकारी पदाचं स्वप्न झालं पूर्ण

लिंब येथील अभियंता संपतराव लक्ष्मण सावंत व सौ. ज्योत्स्ना संपतराव सावंत यांच्या धनश्री या कन्या आहेत. ज्येष्ठ भगिनी भाग्यश्री सावंत या भारतीय नौदलातून कमांडरपदावरून नुकत्याच निवृत्त झाल्या आहेत. धनश्री यांचे पती देविकीरण जगताप (भरतगाववाडी) हे नौदलात कॅप्टनपदी कार्यरत आहेत. धनश्री यांची दुसरी बहिण ॲड. राजश्री सावंत या साताऱ्यात वकिली, तर बंधू श्रीनिवास हे एमएनसी कंपनीत उच्च पदस्थ अधिकारी आहेत.

Dhanashree Sawant Indian Defense Force
तब्बल 16 सरकारी नोकरीच्या ऑफर्स नाकारल्या अन् पहिल्याच प्रयत्नात UPSC मध्ये झाली उत्तीर्ण!

संरक्षक दलात सख्या बहिणी वरिष्ठ अधिकारी!

भारतीय संरक्षण दलाच्या नौदल व भूदलात महिला अधिकारी होण्याचा आगळा वेगळा बहुमान कर्नल धनश्री सावंत व भाग्यश्री सावंत या दोन्ही सख्या बहिणींनी मिळवला असल्याने त्यांचे कौतुक होत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.