रुग्णांच्या मदतीसाठी धावली माहेरवाशीन; कोविड रुग्णालयाला 'लाखमोलाची' मदत

गोंदवल्याच्या कन्या असलेल्या धनाश्री पाटील-गोयल या दिल्लीत उच्चपदस्थ अधिकारी आहेत.
Dhanshree Patil-Goyal
Dhanshree Patil-Goyalesakal
Updated on

गोंदवले (सातारा) : गावात कोविड रुग्णालय (Covid Hospital) आणि अलगीकरण केंद्र सुरू होत असल्याचे समजताच दिल्लीस्थित (Delhi) गोंदवल्याच्या माहेरवाशीन धनश्री पाटील-गोयल (Dhanshree Patil-Goyal) मदतीसाठी धावून आल्या आहेत. सोशल मीडियाच्या माध्यमातून केलेल्या आवाहनातून मदतीचा ओघ सुरू झाला आहे. अवघ्या काही तासांतच तब्बल एक लाखाहून अधिक रक्कम याकामी जमा झाली. (Dhanshree Patil-Goyal Provided Financial Assistance For Covid Patients Satara News)

गोंदवल्याच्या कन्या असलेल्या धनश्री पाटील-गोयल या दिल्लीत उच्चपदस्थ अधिकारी आहेत. सध्या त्या केंद्रीय गृह मंत्रालयात लेखा नियंत्रक म्हणून जबाबदारी सांभाळतात. गावाशी असलेली बांधिलकी त्यांनी अजूनही जपली आहे. गोंदवल्यात माजी आयुक्त प्रभाकर देशमुख यांच्या पुढाकाराने श्री ब्रह्मचैतन्य महाराज संस्थानच्या रुग्णालयात कोविड रुग्णालय व नवचैतन्य हायस्कूलमध्ये विलगीकरण केंद्र सुरू होत असल्याची माहिती त्यांना मिळताच त्यांनी देशमुखांशी चर्चा करत या रुग्णालयासाठी योगदान देण्याची समर्थता दर्शविली.

धनश्री यांनी स्वतः योगदान दिलेच; शिवाय सोशल मीडियाच्या माध्यमातून इतरांना आवाहनही केले आहे. काल (बुधवारी) रात्री केलेल्या आवाहनाला तत्काळ प्रतिसाद मिळून लाखाहून अधिक रक्कम जमा झाले. सध्या ऑक्‍सिजनबरोबरच ऑक्‍सिजन कॉन्सन्ट्रेटर उपलब्धतेसाठीही त्यांनी प्रयत्न सुरू केले आहेत. याकामी दिल्ली जलसंपदा मंत्रालयाचे राज्यमंत्री रतनलाल कटारिया यांचे अतिरिक्त खासगी सचिव म्हणून कार्यरत असलेले धनश्री यांचे पती सौरभ गोयल यांचेही त्यांना सहकार्य मिळत आहे.

गोंदवल्यातील कोविड रुग्णालयातून रुग्णांना चांगल्या सुविधा उपलब्ध व्हाव्यात, यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत.

धनश्री पाटील-गोयल-सौरभ गोयल

Dhanshree Patil-Goyal Provided Financial Assistance For Covid Patients Satara News

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.