कोरोना रुग्णांसह नातेवाईकही गॅसवर; 'हॉस्पिटल' बंद केल्यामुळे नाराजी

सेवा पूर्ववत करण्याची मागणी
Covid Hospital
Covid Hospitalesakal
Updated on

ढेबेवाडी (सातारा) : परिसरात कोरोनाचे (Coronavirus) नवीन रुग्ण सापडत असतानाही येथील शासकीय कोविड हॉस्पिटल (Covid Hospital) चार दिवसांपासून बंद करण्यात आले आहे. बाधित रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांसाठी मोठा आधार बनलेले हे हॉस्पिटल बंद केल्याने नाराजीचा सूर उमटत असून, आवश्यक खबरदारी घेऊन ग्रामीण रुग्णालयातील नियमित ओपीडीबरोबरच तातडीची गरज म्हणून कोरोना वॉर्डही सुरू ठेवण्याची मागणी होत आहे.

Summary

गेल्या वर्षी नऊ सप्टेंबरला येथील ग्रामीण रुग्णालयात ३६ ऑक्सिजन बेडचे कोविड हॉस्पिटल सुरू करण्यात आले.

गेल्या वर्षी नऊ सप्टेंबरला येथील ग्रामीण रुग्णालयात ३६ ऑक्सिजन बेडचे कोविड हॉस्पिटल सुरू करण्यात आले. त्यामुळे ग्रामीण रुग्णालयातील नियमित रुग्णांवरील उपचार बंद ठेवल्याने त्यांची गैरसोय सुरू होती. मात्र, कोरोना रुग्णांना दिलासा मिळाला. साडेतीन महिन्यांत १०२ रुग्ण तेथे उपचारासाठी दाखल झाले, त्यातील ३६ जणांना उपचारासाठी पुढे पाठविण्यात आले. तिघांचा मृत्यू झाला, ६३ रुग्ण उपचार घेऊन बरे झाले. त्यानंतर बंद ठेवलेले हॉस्पिटल यावर्षी १७ एप्रिलला पुन्हा सुरू करण्यात आले होते.

Covid Hospital
दूध उत्पादकांच्या समस्यांवर लवकरच तोडगा काढणार : मंत्री केदार

३१९ रुग्ण उपचारास दाखल झाले. त्यातील ९८ जणांना पुढील उपचारास पाठविण्यात आले. १६ जणांचा मृत्यू झाला तर २०५ रुग्ण येथेच उपचार घेऊन बरे झाले. रुग्णसंख्या कमी झाल्याने चार दिवसांपूर्वी दाखल रुग्णांना दुसरीकडे पाठवून हॉस्पिटल नुकतेच बंद करण्यात आले आहे. मात्र, हॉस्पिटल बंद केल्याने नव्याने सापडणाऱ्या बाधित रुग्णांना मरळी किंवा कऱ्हाडला हलविण्याशिवाय पर्याय उरलेला नाही.

Covid Hospital
15 वर्षात राष्ट्रवादीचे जबरदस्त वर्चस्व; भाजपचीही जोरदार मुसंडी!

आवश्यक खबरदारी घेऊन रुग्णालयात नियमित ओपीडीबरोबर तातडीची गरज म्हणून कोरोना वॉर्डही सुरू ठेवल्यास कोरोना रुग्णांसह नातेवाईकांची ससेहोलपट थांबेल. आम्ही तशी मागणीही केली आहे.

-नानासाहेब साबळे, सदस्य, रुग्णकल्याण समिती, ग्रामीण रुग्णालय, ढेबेवाडी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.