बांधकाम विभागाचं काही नियंत्रण आहे की नाही?; ग्रामस्थांत संताप

Dhebewadi-Karad Road
Dhebewadi-Karad Roadesakal
Updated on

ढेबेवाडी (सातारा) : रात्रंदिवस वाहनांची मोठी वर्दळ असलेल्या ढेबेवाडी-कऱ्हाड मार्गाची मोबाईल केबल (Mobile Cable) पुरण्याच्या नावाखाली ऐन पावसाळ्यात (Heavy Rain) खुदाई सुरू असल्याने वाहनचालक व पादचाऱ्यांची कसरत सुरू आहे. अक्षरशः मनमानी करणाऱ्या या यंत्रणेवर सार्वजनिक बांधकाम विभागाचे (Public Construction Department) काही नियंत्रण आहे की नाही? असा संतप्त सवालही यानिमित्ताने उपस्थित होत आहे. (Dhebewadi-Karad Road Damaged Due To Construction Department Satara Marathi News)

Summary

कोट्यवधी रुपये खर्चून तयार केलेला रस्ता अलीकडे तर केबल पुरण्याच्या नावाखाली बाजूने कुरतडण्यात आला आहे.

कऱ्हाड-पाटण तालुके जोडणाऱ्या ढेबेवाडी-कऱ्हाड मार्गाचे (Dhebewadi-Karad Road) चौपदरीकरण झाल्याने वाहतुकीत सुसूत्रता आलेली असली, तरी वेगवेगळ्या कारणासाठी होणारी रस्त्याची खुदाई व ती करणाऱ्या यंत्रणेची मनमानी यामुळे अपघाताला (Accident) निमंत्रण मिळत आहे. कोट्यवधी रुपये खर्चून तयार केलेला रस्ता अलीकडे तर केबल पुरण्याच्या नावाखाली बाजूने कुरतडण्यात आला असून, त्यासाठी काही ठिकाणी ब्रेकरचाही वापर केल्याचे दिसून येत आहे. बांधकाम विभागाचे जबाबदार अधिकारी संबंधितांनी रीतसर परवानगी घेऊन आणि नुकसान भरपाई भरून कामे केल्याचे सांगत असले, तरी परवानगी व प्रत्यक्षातील खोदकाम संशयास्पद असल्याने वरिष्ठांमार्फत तपासणी होण्याची गरज आहे.

Dhebewadi-Karad Road
राज्य वखार महामंडळाचे अधिकारी, कर्मचा-यांनी दिला संपाचा इशारा

काही दिवसांपूर्वी काळगाव रस्त्यासह ढेबेवाडी-कऱ्हाड मार्गाची तळमावले-काढणेपासून पुढे साइडपट्ट्यांच्या बाजूने चाळण केल्यानंतर आता याच मार्गावरील मालदन-गुढे-काळगाव फाटा दरम्यानच्या रस्त्याकडे त्यांनी मोर्चा वळविला आहे. ऐन पावसाळ्यात साइडपट्टीच्या बाजूने खोदकाम करून मातीचे ढिगारे लावल्याने पावसामुळे दलदल पसरून अपघाताला निमंत्रण मिळत आहे. संबंधितांनी काही ठिकाणचे माईलस्टोनही उखडले असून, अगोदरच मुजत आलेली नाली माती ओढून पूर्णतः बुजवून टाकली आहेत. या प्रकारामुळे पावसाळ्यात रस्ता खचण्याचीही भीती आहे. सध्या तेथे घडत असलेल्या अपघातांना संबंधितांना जबाबदार धरून कारवाई करण्यात यावी, रस्त्यावरील माती-चिखल हटवून गटार तयार करावीत, अशी मागणी होत आहे.

Dhebewadi-Karad Road Damaged Due To Construction Department Satara Marathi News

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()