ढेबेवाडी खोरं म्हणतंय "ये कोरोना ये!'

patan
patan
Updated on

ढेबेवाडी (जि. सातारा) : दोन महिन्यांपूर्वी या परिसरात मुंबईहून दाखल झालेला कोरोना आता दुर्गम वाल्मीक पठारापर्यंत पोचला आहे. आतापर्यंत 84 जणांना कोरोनाची बाधा झाली असून त्यापैकी पाच जणांचा मृत्यू झाल्याने काळजी वाढली आहे. एकूण रुग्णांमध्ये मुंबईकरांचे प्रमाण जास्त असले तरी काही ठिकाणी स्थानिकांतूनही नवे रुग्ण समोर आल्याने नागरिकांचा बेजबाबदारपणाही वाढत्या रुग्णसंख्येला हातभार लावण्यास कारणीभूत ठरला आहे. 

या भागात दोन महिन्यांपूर्वी कोरोनाची मुंबईमार्गे एन्ट्री झाली. सुरवातीला बनपुरी गावात पहिला बळी घेतल्यानंतर त्याने हळूहळू अन्य गावांकडे हातपाय पसरायला सुरवात केल्याने आता गावेच्या गावे काळजीत पडली आहेत. भालेकरवाडी, शितपवाडी, सळवे, सदूवरपेवाडी, तामिणे, चाळकेवाडी, गलमेवाडी, भरेवाडी, धामणी, शेजवळवाडी (साबळेवाडी), मस्करवाडी (धामणी), आचरेवाडी, बागलवाडी, कुंभारगाव, शेंडेवाडी, वाझोली, निगडे, साईकडे, काजारवाडी, कसणी, वायचळवाडी, कारळे, महिंद, अंबवडे खुर्द या गावांतून आतापर्यंत 84 कोरोनाबाधित रुग्ण सापडले असून पाच जणांचा मृत्यू झाला आहे. 

आतापर्यंत येथील सपाटीच्या गावांपुरता मर्यादित राहिलेल्या कोरोनाने आता जंगल परिसरातील अनेक गावांतही प्रवेश केल्याने वाल्मीक पठारापर्यंत संसर्ग पोचला आहे. येथील एकूण रुग्णांमध्ये मुंबईकरांचे प्रमाण जास्त असले तरी आता स्थानिकांतूनही नवे रुग्ण समोर येत असल्याने नागरिकांचा बेजबाबदारपणाही वाढत्या रुग्णसंख्येला हातभार लावण्यास कारणीभूत ठरल्याचे स्पष्ट होत आहे. 

ढेबेवाडीत ग्रामपंचायत व प्रशासनाचा विरोध असतानाही लोक दांडगाव्याने आठवडा बाजार भरवत होते. सोशल डिस्टन्सिंग व अन्य उपाययोजनांचा त्यांनी फज्जाच उडविला होता. नव्याने गावी येणारे नागरिक शाळेत क्‍वारंटाइन होण्याऐवजी थेट आपापल्या घरात घुसत होते. हीच बेशिस्त पुढेही कायम राहिल्यास ढेबेवाडी खोरे व्हेंटिलेटरवर पोचण्याची भीती आहे. 

दुर्गम गावांतील रुग्णांचा ढेबेवाडीशी संपर्क 
परिसरातील डोंगर भागात सापडलेल्या काही कोरोना बाधितांचा व त्यांच्या निकट सहवासीतांचा ढेबेवाडीशी संपर्क आलेला आहे. येथील ग्रामीण रुग्णालयातील यंत्रणेसह खासगी डॉक्‍टरसुद्धा त्यामुळे अस्वस्थ असून बाजारपेठेतील व्यापारीही काळजीत आहेत. सध्या लॉकडाउनमुळे बाजारपेठ बंद असली तरी वैद्यकीय सेवा सुरूच आहे. येथील खासगी दवाखान्यातून उपचार घेतलेल्यांचे संबंधित डॉक्‍टरांनी व्यवस्थित रेकॉर्ड ठेवणे गरजेचे असले तरी काही ठिकाणी त्यात गचाळपणा दिसून येत आहे. 

(संपादन ः संजय साळुंखे)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()