Satara News : खंडाळा-फलटणचे पाणी आज होणार बंद; विहित मंजूर पाणी संपले की कार्यवाही

आवर्तन आणि उन्हाळी आवर्तनासाठी धोम जलाशयातून सात टीएमसी पाणी उपलब्ध करून देण्यात येईल, अशी ग्वाही कृष्णा खोरे विकास महामंडळाने दिली.
खंडाळा-फलटणचे पाणी आज होणार बंद
खंडाळा-फलटणचे पाणी आज होणार बंदSakal
Updated on

कोरेगाव : धोम धरणातून बलकवडी कालव्याद्वारे खंडाळा आणि फलटण तालुक्यात सुरू असलेले विहित मंजूर पाणी समाप्त होताच (सोमवार) बंद करण्यात येईल, तद्वत लाभक्षेत्रात चालू आवर्तन आणि उन्हाळी आवर्तनासाठी धोम जलाशयातून सात टीएमसी पाणी उपलब्ध करून देण्यात येईल, अशी ग्वाही कृष्णा खोरे विकास महामंडळाने दिली.

धोम धरणातील बलकवडी कालव्याद्वारे खंडाळा आणि फलटणला पाणी सोडण्यात येत होते, ते त्वरित थांबवावे व धोम धरण लाभक्षेत्रातील शेतीला हक्काचे मंजूर पाणी वेळेत मिळावे, या मागणीसाठी ३० जानेवारी २०२४ रोजी धोम धरण पाणी बचाव संघर्ष समितीसह शेतकऱ्यांनी कोरेगाव तहसीलदार कचेरीसमोर एक दिवसाचे लाक्षणिक उपोषण केले होते.

उपोषण सोडतेवेळी सिंचन मंडळाच्या अधिकाऱ्यांनी उपोषणस्थळी येऊन समितीच्या सर्वच मागण्यांवर सकारात्मक निर्णय घेण्याची ग्वाही दिली होती. त्यानुसार काल सातारा येथे कृष्णा खोरे विकास महामंडळाचे उपाध्यक्ष व आमदार महेश शिंदे यांच्या उपस्थितीत सातारा सिंचन मंडळाचे अधीक्षक अभियंता, कार्यकारी अभियंता तसेच सिंचन प्रकल्प मंडळाचे अधीक्षक अभियंता यांच्‍यासोबत चर्चा झाली.

त्यात सर्वांनी सकारात्मक चर्चा करत धोम धरणातून बलकवडी बोगद्यातून खंडाळा व फलटण तालुक्यात सुरू असलेले विहित मंजूर पाणी समाप्त होताच ते उद्यापासून बंद करण्यात येईल. यानंतर कोणत्याही कारणास्तव बलकवडी कालव्यातून पाणी सोडले जाणार नाही, अशी हमी देण्यात आली.

तद्वत लाभक्षेत्रात चालू असलेले आवर्तन आणि उन्हाळी आवर्तनासाठी धोम जलाशयात सात टीएमसी पाणी उपलब्ध करून देण्यात येईल, अशी ग्वाही देण्यात आली. त्यामुळे धोम लाभक्षेत्रातील उन्हाळी सिंचनासाठी पाणी उपलब्ध होणार आहे. बैठकीस समितीचे अध्यक्ष सी. आर. बर्गे, कार्याध्यक्ष रणजित शिवाजीराव फाळके, उदयसिंह बर्गे, प्रणव बर्गे, सुधाकर बर्गे उपस्थित होते.

धोम धरण समितीला विश्वासात घ्या...

बैठकीत उपाध्यक्ष व आमदार शिंदे यांनी धोम धरण पाणी बचाव संघर्ष समितीशी चर्चा करूनच पुढील नियोजन करण्याच्या सूचना अधीक्षक अभियंत्यांना दिल्याची माहितीही समितीने दिली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.