सातारा : प्रॉपर्टी कार्डचे डिजिटलायझेशन पूर्णत्वाकडे

सातारा शहरातील काम ९९ टक्के पूर्ण; मिळकतधारकांना ऑनलाइन मिळणार
प्रॉपर्टी कार्डचे डिजिटलायझेशन
प्रॉपर्टी कार्डचे डिजिटलायझेशन sakal
Updated on

सातारा : ऑनलाइन सातबाऱ्याप्रमाणेच शहरातील प्रॉपर्टी कार्डचे डिजिटलायझेशनचे काम ९९ टक्के पूर्ण झाले आहे. त्याचबरोबर साताबारा उताऱ्याप्रमाणे आता प्रॉपर्टी कार्डचा प्रिव्ह्यू पाहून योग्य असल्यास नागरिकांना तो सशुल्क काढता येईल.

शेतकऱ्यांना सातबारा उताऱ्यासाठी तलाठ्याकडे जावे लागू नये, यासाठी सातबारा ऑनलाइन करण्याची मोठी मोहीम शासनाने राबविली. सातबाऱ्याबरोबरच फेरफारही ऑनलाइन उपलब्ध करून देण्यात आले आहेत. नुकतेच सातबाऱ्यातील नोंदीमध्येही बदल करण्यात आले. त्यानंतर शेतकऱ्याला साताबारा घरपोच देण्याची मोहीमही महसूल विभागाकडून राबविण्यात आली होती. सातबारा ऑनलाइन झाला; परंतु प्रॉपर्टी कार्ड मात्र नागरिकांना नगरभूमापन कार्यालयात जाऊन प्रत्यक्ष काढावा लागत होता.

प्रॉपर्टी कार्डचे डिजिटलायझेशन
..आणि बच्चू कडू धावले..महामार्गावर जखमी पती पत्नी यांना घातले स्वतःच्या गाडीत

त्यासाठी नागरिकांना कार्यालयात जाऊन प्रत्यक्ष अर्ज करावा लागत होता. अर्ज घेऊन कार्यालयात गेल्यानंतर प्रॉपर्टी कार्डवरील नोंदणीची संख्या पाहून प्रॉपर्टी कार्डच्या नकलेसाठी आवश्यक असणारे शासकीय शुल्क निश्चित करून दिले जात होते. ही रक्कम भरल्यानंतर प्रत्यक्ष अर्ज स्वीकारला जात होता. त्यासाठी नागरिकांना प्रत्येक ठिकाणी रांगेत थांबावे लागत होते. अर्ज स्वीकारल्यानंतर दोन ते तीन दिवसांनी नागरिकांना आपल्या प्रॉपर्टी कार्डची नक्कल मिळत होती. या प्रक्रियेमुळे तातडीच्या वेळी आवश्यकता असल्यास प्रॉपर्टी कार्ड मिळत नव्हते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.