सातारा : तुम्ही आपली वस्तू एखाद्या ठिकाणी विसरले तर ती परत केली जाईल, याची शाश्वती फार कमी असते. मात्र, साता-यातील उद्योजक सारंग गुजर यांनी प्रामाणिकपणा दाखवत एका महिलेने त्यांच्या फुटका तलावनजीकच्या बेकरीत विसरलेल्या पर्सचा फोटो फेसबुक या सोशल माध्यमावर शेअर करत माणुसकीचे दर्शन घडविले आहे.
सध्याच्या घडीला आपल्याकडून एखादी वस्तू हरवली की, ती परत मिळणे फारच मुश्किल. मात्र, अशी काही माणसं आहेत ती वारंवार माणुसकीच्या दृष्टीने पुढाकार घेत आहेत. सातारा शहरात नुकतीच एक घटना घडली, त्याची सर्वत्र चर्चा रंगली आहे. उद्याेजक सारंग गुजर यांनी त्यांच्या फेसबुकवर आज (बुधवार) सकाळी एक पाेस्ट केली. त्यामध्ये सापडली आहे. पाहून घ्या, असे लिहिले आणि साेबत एका पर्सचे छायाचित्र टाकले.
जागतिक छायाचित्रण दिन : काळ बदलला अन् छायाचित्रणाची माध्यमही बदलली
गुजर यांची साता-यातील फुटका तलावानजीक बेकरी आहे. त्यांच्या बेकरीत बहुधा एका ग्राहकाची पर्स विसरली. पर्स सापडताच त्यांनी सीसीटीव्ही फुटेज तपासले पण तांत्रिक अडचणींमुळे नक्की काेणाची आहे हे समजू शकले नाही. दरम्यान त्यांच्या पर्सची फेसबुक पाेस्ट क्षणाधार्त व्हायरल झाली. अनेकांनी शेअर केली तर परिचितांनी त्यांच्या प्रामाणिकपणाचे काैतुक केले.
जगी ज्यास कोणी नाही, त्यास देव आहे.., वाचा 'तिच्या' विषयी
ही पर्स गुलाबी रंगाची आहे. त्याच्या बाहेर थाेडी रोकड आणि एक दागिना छायाचित्रात दिसत आहे. तसेच त्या पर्समध्ये एक लाल रंगाची छोटी पर्सही होती असे दिसून येते. काहींनी गुजर यांच्या प्रामाणिकपणाबद्दल काैतुक करुन, माणुसकी शिल्लक असल्याची स्तुती केली आहे. सध्या नेटीझन्स पर्सच्या मालकांपर्यंत याबाबतची माहिती पाेचविण्यासाठी प्रयत्न करीत आहेत.
या कॅप्टनने विमान बनवलयं; प्रवासाचे स्वप्नही नजरेच्या टप्प्यात
आज प्रामाणिकपणाच्या उगीचच बाता मारणारे अनेक लोक आहेत, त्यास काही अपवाद ही आहेत. मात्र, कोणाच्या कृतीतून हा प्रामाणिकपणा कधीच दिसत नाही. सद्यस्थितीत हरवलेली वस्तू परत करणे, हे कोणाकडून शक्य नाही. परंतु, असे काही लोक आहेत, जे प्रामाणितेला अधिक महत्व देत हरवलेली वस्तू परत करतात. साता-यात एखादी पर्स हरवते हा प्रकार काही वेगळा नाही, कारण शहरात दररोज किमान दहा ते पंधरा वस्तू हरवल्याची पोलिसांत नोंद होते. त्यात किरकोळ वस्तू हरवली की, काहींकडून पोलिसांत नोंद केली जात नाही. असे सर्रास प्रकार शहरात नेहमी होत असतात; पण सापडलेली वस्तू परत करावी अशी हाताच्या बाेटावर माेजण्या इतपत लाेकांची मानसिकता असते. सोशल माध्यमाचा वाह्यात वापर न करता चांगल्या कामासाठी करता येऊ शकताे हे उद्योजक सारंग गुजर यांच्याकृतीतून पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे.
रेमेडिसिव्हर इंजेक्शनच्या त्या प्रकरणावर राष्ट्रवादी आक्रमक
Edited By : Siddharth Latkar
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.