बोलू न दिल्याने शिक्षक बँकेच्‍या ऑनलाइन सभेत 'गोंधळ'

बँकेच्‍या सभासदांना ९ टक्के लाभांश जाहीर
Primary Teachers Bank
Primary Teachers Bankesakal
Updated on

सातारा : येथील प्राथमिक शिक्षक बँकेच्‍या (Primary Teachers Bank) झालेल्‍या ऑनलाइन सभेत (Online Meeting) सभासदांना नऊ टक्के लाभांश देण्‍याचा निर्णय घेण्‍यात आला. या ऑनलाइन सभेदरम्‍यान बोलू न देता माईक बंद केल्‍याचा आरोप करत शिक्षक समितीच्‍या संचालकांनी गोंधळ घातला. या गोंधळातच बँकेचे अध्यक्ष राजेंद्र घोरपडे (Bank Chairman Rajendra Ghorpade) यांनी सभासदांनी उपस्‍थित केलेल्‍या प्रश्‍‍नांना उत्तरे देत सभेचे कामकाज पूर्ण केले.

Summary

ऑनलाइन सभेदरम्‍यान बोलू न देता माईक बंद केल्‍याचा आरोप करत शिक्षक समितीच्‍या संचालकांनी गोंधळ घातला.

कोरोनाच्‍या कारणास्‍तव प्राथमिक शिक्षक बँकेच्‍या ७४ व्‍या वार्षिक सभेचे ऑनलाइन पद्धतीने आयोजन करण्‍यात आले होते. सभेत श्री. घोरपडे यांनी बँकेस यावर्षी ४ कोटी ६ लाखांचा नफा झाल्‍याचे सांगत नऊ टक्के लाभांश देण्‍याची घोषणा केली. बँकेच्‍या आर्थिक स्‍थितीचा अहवाल मांडत सभासदांसाठी नव्‍याने कार्या‍न्‍वित केलेल्‍या योजनांची तसेच ठेव, कर्जावरील व्‍याजदरात केलेल्‍या बदलांची माहिती सभासदांना देत बँकेच्‍या डिजिटल सेवांचा लाभ घेण्‍याचे आवाहनही त्यांनी केले. त्यानंतर सभेपुढे मांडलेल्‍या विषयपत्रिकेचे वाचन बँकेचे प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी प्रमोद परमणे यांनी केले. विषय वाचन सुरू असतानाच शिक्षक समितीचे संचालक किरण यादव यांनी विरोध दर्शविण्‍यास सुरुवात केल्‍याने गोंधळ उडाला.

Primary Teachers Bank
जिल्हा बॅंकेसाठी 'राष्ट्रवादी'चा मास्टर प्लॅन

सभासदांच्‍या प्रश्‍‍नांची उत्तरे देत श्री. घोरपडे यांनी सभेचे कामकाज सुरूच ठेवल्‍याने त्‍यास विरोधी संचालकांनी हरकत घेत उत्तर देण्‍याचे आवाहन केले. याचवेळी विरोधी संचालकांचे माईक बंद झाले. त्यास यादव यांनी हरकत घेत सभाध्‍यक्षांकडे माईक सुरू करण्‍याची मागणी केली. मात्र, ती कार्यवाही पूर्ण होईपर्यंत बहुतांश सभेचे कामकाज पूर्ण होत आले होते. सभेदरम्‍यान बॅंकेचे उपाध्यक्ष महेंद्र अवघडे यांनी बँकेने जाहीर केलेल्‍या विविध योजना, आपत्कालीन मदत योजना तसेच इतर डिजिटल सुविधांचा लाभ घेण्‍याचे आवाहन केले. ऑनलाइन सभेस तसेच संचालक भगवान धायगुडे, राजकुमार जाधव, चंद्रकांत आखाडे, मोहन निकम, शंकर जांभळे, ज्ञानेश्‍वर कांबळे, गणेश तोडकर, राजाराम खाडे, तुकाराम कदम, अनिल शिंदे, वैशाली जगताप, दत्तात्रय कोरडे, बंडोबा शिंदे, सुभाष शेवाळे, किरण यादव, चंद्रकांत मोरे, शिवाजी शिंदे आदी संचालक तसेच सभासद उपस्‍थित होते.

Primary Teachers Bank
सत्ताधारी थापांचा पाऊस पाडण्‍यात माहीर

बँकेच्या कारभारावर विरोधकांचा निशाणा

सभेदरम्यान शिक्षक समितीच्या संचालकांनी सत्ताधारी गटास लक्ष्य करत प्रश्‍नांची सरबत्ती केली. त्यामुळे गोंधळलेल्‍या सत्ताधारी गटाने विरोधी गटाचा माईक बंद केला. हा माईक सुरू करण्यासाठी विरोधी संचालकांनी सभेत गोंधळ घालत कामकाज रोखून धरले. यावेळी विरोधी संचालकांनी अध्यक्ष राजेंद्र घोरपडे यांना प्रश्‍न विचारून घेरत अध्यक्षांनी काढलेल्या नियमबाह्य कर्जाचा मुद्दा उपस्थित केला. प्रश्‍न-प्रतिप्रश्‍नाच्या खेळात सभेचा माहोल तप्त झाला होता. या गोंधळातच सभेचे कामकाज उरकत सत्ताधाऱ्यांनी विरोधकांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप उदय शिंदे यांनी केला आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()