पाच वर्षांत साथीचा कुठलाही प्रादुर्भाव नाही

मोहिमेत पाटण तालुक्यातील सर्वाधिक 230 ग्रामपंचायतींचा सहभाग
Gram Panchayat
Gram Panchayatesakal
Updated on

सातारा : गेल्या पाच वर्षांत जलजन्य साथीचा कुठलाही प्रादुर्भाव आढळला नाही, अशा ग्रामपंचायतींना (Gram Panchayat) जिल्हा परिषदेच्या (Zilla Parishad) पाणी व स्वच्छता मिशन विभागाच्या (Water and Sanitation Mission Department) वतीने चंदेरी कार्ड (Chanderi card) प्रमाणपत्राचे वाटप करण्यात आले आहे. यामध्ये जिल्ह्यातील एक हजार ४१९ ग्रामपंचायतींचा समावेश असून, सर्वाधिक २३० ग्रामपंचायती पाटण तालुक्यातील आहेत.

Summary

जिल्ह्यातील ग्रामपंचायतींचे दर वर्षी पिण्याचे पाणी स्रोत अंतर्गत स्वच्छता सर्वेक्षण करण्यात येते.

जिल्ह्यातील ग्रामपंचायतींचे दर वर्षी पिण्याचे पाणी स्रोत अंतर्गत स्वच्छता सर्वेक्षण करण्यात येते. यामध्ये जिल्ह्यातील ज्या गावांमध्ये वर्षभर कुठलाही साथीचा प्रादुर्भाव झाला नाही. त्या गावांना जिल्हा परिषदेच्या वतीने हिरवे कार्ड देण्यात येते. त्याचप्रमाणे सलग पाच वर्ष पाणी अस्वच्छतेचा कुठलाही प्रादुर्भाव न झाल्यास चंदेरी कार्ड देण्यात येते. यामध्ये यंदा जिल्ह्यातील एक हजार ४१९ ग्रामपंचायतींचा समावेश असून, पालकमंत्री, जिल्हा परिषद अध्यक्ष व मुख्य कार्यकारी अधिकारी यांचे प्रमाणपत्र देण्यात आले आहे.

Gram Panchayat
डॉ. दाभोलकरांच्या खुनामागील सूत्रधार का सापडत नाही?

दरम्यान, जिल्ह्यातील ग्रामपंचायतींच्या सर्वेक्षणात सातारा तालुक्यातील १८९ ग्रामपंचायती, कोरेगाव १३७, खटाव ११८, माण ८६, फलटण १२४, खंडाळा ५६, वाई ९७, जावळी ११८, महाबळेश्‍वर ७९, कऱ्हाड १८५, पाटण २३० या ग्रामपंचायतींचा समावेश असल्याची माहिती उपमुख्य कार्यकारी अधिकारी किरण सायमोते यांनी दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.