'विधान परिषदेचे सदस्य आमदार शशिकांत शिंदे यांचा एका मताने पराभव झाला याचं शल्य निश्चित आहे.'
सातारा : जिल्हा बॅंकेच्या निवडणुकीत कऱ्हाड तालुक्यातील मतदारांनी मला थेट बॅंकेत जाण्याची संधी दिलीय. जिल्हा बॅंकेच्या निवडणुकीसाठी राजकीय संदर्भ वेगळे असतात. मात्र, निडवणुकीमुळे राजकीय समीकरणं बदण्याची शक्यता नाकारता येत नाही, असं सूचक वक्तव्य सहकारमंत्री बाळासाहेब पाटील यांनी आज मंगळवारी सातारा जिल्हा बॅंकेच्या निवडणुकीतील विजयानंतर केले.
सातारा जिल्हा बॅंकेच्या निवडणुकीत सहकार मंत्री पाटील विजयी झाले. त्यानंतर त्यांनी निवडणूक निर्णय अधिकारी मनोहर माळा यांच्याकडून निवडून आल्याचे प्रमाणपत्र स्वीकारले. त्यानंतर पत्रकारांशी बोलताना मंत्री पाटील म्हणाले, जिल्हा बॅंकेच्या निवडणुकीत सहकार पॅनेलला चांगले यश मिळाले. उमेदवारी अर्ज दाखल केल्यापासून यश मिळेल, अशी परिस्थिती होती. अर्ज माघारीच्या दिवशी ११ जागा बिनविरोध झाल्या. उर्वरित दहा जागांसाठी निवडणूक झाली. त्यामध्ये सहकार पॅनेलचा विजय झाला. त्याबद्दल सर्व मतदारांचे मी आभार मानतो. ज्येष्ठ नेते खासदार शरद पवार यांनी माझ्यावर सहकारमंत्री आणि सातारा जिल्ह्याची पालकमंत्री म्हणून जबाबदारी दिली. त्यामुळं वेगळे महत्व या निवडणुकीला प्राप्त झाले. ही निवडणूक महत्वाची होती.
निवडणुकीसाठी तुम्ही भाजपच्या नेत्यांची मदत घेतली आहे, या प्रश्नावर ते म्हणाले, जिल्हा बॅंकेच्या निवडणुका या राजकीय गटतट विसरुन केल्या जातात. मला कऱ्हाड दक्षिणमधील डॉ. सुरेश भोसले, अतुल भोसले, मदनराव मोहिते, भीमरावदादा पाटील, जगदीश जगताप, धनंजय पाटील, कऱ्हाड उत्तरमधील मानसिंगराव जगदाळे, देवराज पाटील व सहकाऱ्यांनी निवडणुकीत सहकार्य केल्याने हा विजय झाला. जिल्हा बॅंकेच्या निवडणुकीत कऱ्हाड तालुक्यातील मतदारांनी मला बॅंकेत थेट जाण्याची संधी मिळाली आहे.
शशिकांत शिंदेंच्या पराभवाचं शल्य
विधानपरिषदेचे सदस्य आमदार शशिकांत शिंदे यांचा एका मताने पराभव झाला याचं शल्य निश्चित आहे, असे सांगून सहकारंत्री पाटील म्हणाले, राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या कार्यालयावर शशिकांत शिंदेंच्या समर्थकांनी दगडफेक केल्याची माहिती मला आत्ताच पोलिसांनी दिली. शशिकांत शिंदेंच्या विजयासाठी सर्वांनी प्रयत्न केले. सर्वांशी चर्चा केली. मात्र, जे मतदार बाहेरगावी गेले होते. ते लवकर आले नाहीत. त्यामुळं हा तणाव वाढत गेला. त्याचा निकालावर परिणाम झाला आहे, तरीही शशिकांत शिंदे यांनी उशीरा सुरुवात करुन चांगली मजल गाठलीय.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.