कोरोनाबाधितांकडून 20 लाखांचं अधिकचं बिल; रक्कम परत करण्याचे हॉस्पिटल्सना आदेश

Hospital
Hospitalesakal
Updated on

सातारा : जिल्ह्यातील रुग्णालयांकडून (Hospital) कोरोना बाधित रुग्णांकडून आकारण्यात येणाऱ्या वैद्यकीय उपचारांची देयक पथकामार्फत तपासणी करण्यात येणार आहे. एकूण 183 रुग्णांची जादा आकारणी करण्यात आलेली रक्कम 20 लाख 56 हजार 743 परत करण्याचे आदेश जिल्हाधिकारी शेखर सिंह (Collector Shekhar Singh) यांनी उपविभागीय अधिकाऱ्यांना दिले आहेत. (District Collector Shekhar Singh Hospital Ordered To Refund 20 Lakh Bill Of Corona Patient)

Summary

जिल्ह्यातील रुग्णालयांकडून कोरोना बाधित रुग्णांकडून आकारण्यात येणाऱ्या वैद्यकीय उपचारांची देयक पथकामार्फत तपासणी करण्यात येणार आहे.

महात्मा जोतिबा फुले जन आरोग्य योजनेचा (Mahatma Jyotiba Phule Jan Arogya Yojana) लाभ बाधित रुग्णांना सर्व अंगीकृत रुग्णालयांमार्फत उपलब्ध करुन देणे. याबाबत शासनाने वेळावेळी घेतलेल्या निर्णयांची अंमलबजावणी होत आहे अगर कसे? तसेच जिल्ह्यातील रुग्णालयांकडून कोरोना बाधित रुग्णांकडून आकारण्यात येणारी वैद्यकीय उपचारांची देयक योग्य आहे का? याची तपासणी करण्यासाठी जिल्ह्यातील 63 हॉस्पिटलसाठी 63 ऑडिटर व तपासणी अधिकाऱ्यांच्या पथकांची नेमणूक करण्यात आली आहे.

या पथकामार्फत एकूण 63 हॉस्पिटलमधील 4579 एवढ्या रुग्णांच्या बिलांची तपासणी करण्यात आली. या तपासणीमध्ये रुग्णालयांनी 22 कोटी 62 लाख 20 हजार 239 इतकी रक्कम आकारण्यात आली होती. सातारा जिल्ह्यामध्ये महात्मा जोतिबा फुले जन आरोग्य योजना 28 हॉस्पिटलमध्ये सुरु असून या हॉस्पिटलमध्ये एकूण बेडच्या 80 टक्के बेड राखीव ठेवण्याच्या सूचनाही जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी दिल्या आहेत.

District Collector Shekhar Singh Hospital Ordered To Refund 20 Lakh Bill Of Corona Patient

Hospital
'कृष्णा'साठी माजी अध्यक्षांसह 23 जणांचे अर्ज दाखल, दोन विद्यमान संचालकही मैदानात!

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.