सातारा : सध्यस्थितीत सातारा जिल्ह्यातील RT-PCR टेस्ट पॉझिटिव्हीटी रेट पाहता, जिल्ह्याचा तिसऱ्या स्तरामध्येच समावेश झाला असल्याने शासनाच्या सूचनेनुसार, जिल्हाधिकारी शेखर सिंह (Collector Shekhar Singh) यांनी 1973 चे कलम 144 व आपत्ती व्यवस्थापन कायदा 2005 मधील तरतूदीनुसार, 26 जुलै 2021 रोजीचे पुढील आदेश येईपर्यंत खालीलप्रमाणे नव्याने आदेश पारित केला आहे. (District Collector Shekhar Singh Order To Reduce Lockdown Restrictions In Satara District bam92)
सातारा जिल्ह्यात आठवड्याच्या सर्व दिवशी सकाळी 5 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत जमावबंदी व सायंकाळी 5 वाजल्यापासून ते सकाळी 5 वाजेपर्यंत संचारबंदी लागू करण्यात आली आहे.
सातारा जिल्ह्यात आठवड्याच्या सर्व दिवशी सकाळी 5 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत जमावबंदी व सायंकाळी 5 वाजल्यापासून ते सकाळी 5 वाजेपर्यंत संचारबंदी (Corona Lockdown) लागू करण्यात येत असून त्यामुळे संचारबंदीच्या वेळेत वैध कारणाशिवाय कोणत्याही व्यक्तीस संचार करण्यास मनाई करण्यात आली आहे. जिल्ह्यातील सर्व शाळा, महाविद्यालये, कोचिंग क्लासेस पूर्णपणे बंद राहतील. तथापि, ऑनलाइन शिक्षणास (Online Education) परवानगी असेल. तसेच वैद्यकीय महाविद्यालये, नर्सिंग कोर्सेस चालू ठेवण्यास परवानगी असेल. अत्यावश्यक बाबीची दुकाने, आस्थापना या आठवड्याच्या सर्व दिवशी सकाळी 9 ते सायंकाळी 4 पर्यंत चालू ठेवण्यास परवानगी असेल. मात्र, मेडिकल, औषधांची दुकाने सकाळी 9 ते रात्री 8 वाजेपर्यंत चालू राहतील. दरम्यान, हॉस्पिटलमधील मेडिकल,औषधांची दुकाने पूर्णवेळ चालू ठेवण्यास परवानगी देण्यात आली आहे.
अत्यावश्यक नसलेली दुकान, आस्थापना ही सोमवार ते शुक्रवार सकाळी 9 ते सायंकाळी 4 यावेळेत सुरु ठेवण्यास परवानगी दिली असून मॉल, सिनेमागृहे, नाट्यगृहे पूर्णपणे बंद राहणार आहेत. सकाळी 7 ते सायंकाळी 4 या कालावधीत हॉटेल, रेस्टॉरंटना आसन क्षमतेच्या 50% क्षमतेने चालू ठेवण्यास परवानगी असेल. शिवाय घरपोच पार्सल सेवा व लॉजिंग, बोर्डींग सुरु ठेवण्यास देखील परवानगी देण्यात आली आहे. सर्व खाजगी कार्यालयांना सायंकाळी 4 वाजेपर्यंत 50 टक्के क्षमतेने चालू ठेवण्यास परवानगी, तर शासकीय, निम-शासकीय कार्यालये 50 टक्के क्षमतेने चालू ठेवण्यास परवानगी देण्यात आली आहे. खुल्या जागेतील क्रीडाविषयक बाबी या आठवड्याच्या सर्व दिवशी चालू ठेवण्यास परवानगी असेल. मात्र, कोणत्याही क्रीडासंबंधी स्पर्धा आयोजित करण्यास मनाई करण्यात आली आहे.
सामाजिक, सांस्कृतिक, धार्मिक, प्रार्थना स्थळे, करमणूक कार्यक्रम, मेळावे हे पूर्णपणे बंद राहणार आहेत. तसेच लग्न समारंभ दोन तासापेक्षा जास्त नसेल इतक्या कालावधीत 25 लोकांच्या मर्यादेत लग्न आयोजन करण्यास परवानगी घेणे बंधनकारक राहील. याबाबत उल्लंघन झाल्यास संबंधित व्यवस्थापनाकडून 25 हजार दंड व दुसऱ्या वेळीही भंग झाल्यास 1,00,000 दंड केला जाणार आहे. केश कर्तनालय, सौदर्य केंद्रे ही आसन क्षमतेच्या 50% क्षमतेने चालू ठेवण्यास परवानगी राहील. अत्यावश्यक सेवेमधील दुकानादार मालक, कर्मचारी किंवा ग्राहकांनी वरील नियमांचे पालन न केल्यास त्यांच्यावर 500 रुपये दंड आकारण्यात येणार आहे.
District Collector Shekhar Singh Order To Reduce Lockdown Restrictions In Satara District bam92
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.