Diwali Festival 2020 मावळ्यांची सज्जनगड मोहीम फत्ते; उद्या दीपोत्सवाने उजळणार गड-किल्ला

Diwali Festival 2020 मावळ्यांची सज्जनगड मोहीम फत्ते; उद्या दीपोत्सवाने उजळणार गड-किल्ला
Updated on

सातारा : आपण लहान असताना दिवाळी आली की, आपल्या दारात किल्ले बनवायचो. आपला किल्ला इतरांपेक्षा कसा उठावदार आणि वेगळा असावा यासाठी जीव की प्राण करायचो. परंतु, आता परिस्थिती थोडी वेगळी आहे. बहुतांश गड-किल्ले हे दुरावस्थेत दिसून येत आहेत. त्यामुळे परळी खोर्‍यातील मावळ्यांनी सज्जनगड येथील बुरुजाच्या स्वच्छता मोहिमेचा कार्यक्रम आखला. जवळपास 50 हुन अधिक मावळ्यांनी सज्जनगड येथील बुरुजाची, तसेच आसपासच्या परिसराची स्वच्छता मोहीम फत्ते केली. 

तसेच ह्या दिवाळीत छोटे गड-किल्ले तयार करण्यापेक्षा आपल्या आसपासच्या ऐतिहासिक गड किल्ल्यांचा संवर्धनाचा संदेश या माध्यमातून परळी खोऱ्यातील या मावळ्यांनी दिला आहे. यावेळी पावसाळ्यात आलेल्या बुरुजा शेजारील गवताची स्वच्छता, तसेच बुरुजावर असलेल्या झाडांमुळे बुरुज कमकुवत होत असल्याने तीही झाडे तोडण्यात आली. सह्याद्रिच्या पर्वत रांगेत खूप किल्ले आहेत. या गडांना छत्रपती शिवरायांचा पदस्पर्श लागला आहे. या किल्ल्याचे संवर्धन, जतन करणे हे प्रत्येकाचे कर्तव्य आहे. यापुढे ही अशाच दुर्ग संवर्धन मोहिमा आखून गडांना सुशोभित करण्यात येइल, असा निर्धार संयोजकांनी व्यक्त केला. अतिवृष्टीने बुरुज ढासळला. या गोष्टीला दोन वर्ष झाली. पण, काहीच हालचाल नाही. बुरुज, तटबंदी हे गडाचे वैभव असते. ते सुशोभित असलेच पाहिजे. त्याची निगा राखली पाहिजे. दुस-याकडे बोट दाखवण्याअगोदर आपणच सुरुवात करायला हवी. 

किल्ले सज्जनगडावर उद्या मशालोत्सव

महाराजांचे पराक्रम, तसेच त्यांच्या शौर्य गाथा ह्या तरुणांमध्ये अधिकाअधिक रुजवण्यासाठी परळी खो-यातील शिवभक्त हे सातत्याने पुढाकार घेवून नवनवीन संकल्पना राबवत असतात. जो पूर्वजांनी जपून ठेवलेला गडकिल्ल्यांचा वारसा अबाधित ठेवण्यासाठी झटताना दिसत आहे. दिवाळी पहाटचे औचित्य साधत शनिवार 14 नोव्हेंबर रोजी सकाळी 5 वाजता किल्ले सज्जनगडावर मशालोत्सव साजरा करण्यात येणार आहे. एक दिवा शिवरायांच्या चरणी या संकल्पनेतून अधिकाधिक शिवविचार तरुणांमध्ये रुजावे, तसेच गडकिल्यांचे महत्त्व समजावे यासाठी या मशालोत्सवाचे आयोजन असल्याचे दुर्गसंवर्धकांनी सांगितले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.