NCP आमदाराचा 'करेक्ट' कार्यक्रम करणारे रांजणे म्हणाले, शिवेंद्रसिंहराजेच..

Dnyandev Ranjane
Dnyandev Ranjaneesakal
Updated on
Summary

'आमदार शिवेंद्रसिंहराजे आमचे नेते असून, त्यांची भूमिका हीच आमची भूमिका यापुढच्या काळात असेल.'

सातारा : ‘सकाळ’ने नेहमीच सकारात्‍मक आणि विकासात्‍मक कामांना प्राधान्‍य दिले आहे. तनिष्‍का उपक्रमामुळे मी व माझे कुटुंबीय ‘सकाळ’शी जोडलो गेलो. समाजकारण, राजकारणातील प्रत्‍येक टप्‍प्‍यावर ‘सकाळ’ माझ्‍या पाठीशी ठाम राहिल्‍याची भावना जिल्‍हा बँकेचे संचालक ज्ञानदेव रांजणे (Dnyandev Ranjane) यांनी व्‍यक्‍त केली.

जिल्‍हा बँक निवडणुकीत (Satara District Bank Election) हायव्‍होल्‍टेज लढत देत संचालक म्‍हणून निवडून आलेल्‍या रांजणे यांनी काल ‘सकाळ’च्‍या साताऱ्यातील कार्यालयास सदिच्‍छा भेट दिली. यावेळी सहयोगी संपादक राजेश सोळसकर, वरिष्‍ठ व्‍यवस्‍थापक राजेश निंबाळकर यांनी त्यांचे स्वागत केले. यावेळी ‘सकाळ’चे केळघरचे बातमीदार संदीप गाडवे, सागर धनावडे, शांताराम पार्टे, प्रफुल्‍ल शेलार, जाहिरात प्रतिनिधी रोहित निलाखे, वरिष्ठ बातमीदार उमेश बांबरे व कार्यालयीन सहकारी उपस्‍थित होते. श्री. रांजणे यांनी ‘सकाळ रिलीफ फंडाच्या वतीने जावळी तालुक्यातील विविध गावांत केलेल्या जलसंधारण कामांचा आवर्जून उल्लेख केला. आजपर्यंत आम्ही राबविलेल्या सामाजिक उपक्रमांना ‘सकाळ’ने नेहमीच पाठिंबा दिला, असेही त्यांनी नमूद केले.

Dnyandev Ranjane
Political News : निवडणुकीत अमित शहा काँग्रेसचा खेळ बिघडवणार
Satara Sakal office
Satara Sakal office

चर्चेदरम्‍यान या निवडणुकीदरम्यान झालेल्या घडामोडी-घटनांची माहितीही त्यांनी दिली. ते म्‍हणाले, ‘‘जिल्‍हा बँकेच्‍या जावळी सोसायटी (Jawali Society) मतदारसंघातील लढतीकडे संपूर्ण राज्‍याचे लक्ष होते. या निवडणुकीतून मी माघार घ्‍यावी, यासाठी सर्वच शक्‍तींचा वापर करण्‍यात येत होता. दबाव व इतर तंत्रांचा वापर होत असतानाही जावळीतील मतदार माझ्‍यासोबत राहिले. मतदारांनी मला माघारी न घेण्‍याच्‍या बोलीवरच पाठिंबा दिला होता. त्‍यांचा हा पाठिंबा आणि एकसंघतेच्‍या जोरावर आम्‍ही विजय साकारला.’’ शिवेंद्रसिंहराजे (Shivendrasinharaje Bhosle) आमचे नेते असून, त्यांची भूमिका हीच आमची भूमिका यापुढच्या काळात असेल. अत्‍यंत ताकदीच्‍या, प्रतिष्‍ठेच्‍या निवडणुकीत जावळीचे नेते वसंतराव मानकुमरे यांनी यशस्‍वी कॅप्‍टनशिप निभावल्‍याचेही श्री. रांजणे यांनी यावेळी सांगितले.

Dnyandev Ranjane
राष्ट्रवादीला हिसका दाखवण्यासाठी शिवसेना, काँग्रेस स्वबळावर लढणार?

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.