सून कोरोना बाधित झाल्याच्या धक्‍क्‍याने सासऱ्यांचा मृत्यू

karad
karad
Updated on

तांबवे (जि. सातारा) ः वसंतगड (ता. कऱ्हाड) येथील सूनेला कोरोनाची बाधा झाली. त्यानंतर त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, सून कोरोनाबाधित झाल्याचा धक्का बसल्याने त्यांच्या सासऱ्याचा हृदयविकाराने मृत्यू झाल्याची घटना घडली. त्यामुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. 

कोरोनाचे लोण आता गावागावांत पोचू लागले आहे. कऱ्हाड तालुक्‍यातील अनेक गावांत कोरोनाबाधित रुग्ण सापडू लागले आहेत. त्यामुळे तालुक्‍यात चिंता वाढली आहेत. वसंतगड येथे 15 दिवसांपूर्वी मुंबईहून आलेली महिला कोरोना पॉझिटिव्ह असल्याचा रिपोर्ट दोन दिवसांपूर्वी रात्री उशिरा आला. वसंतगडमध्ये पहिला कोरोनाबाधित सापडल्याने गावकरी चिंतेत आहेत. सुपने प्राथमिक आरोग्य केंद्राच्या पथकाने रिपोर्ट आला त्याच दिवशी रात्री एकच्या सुमारास संबंधित महिलेस उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले. त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले तोच मध्यरात्री दीडच्या सुमारास संबंधित महिलेच्या 75 वर्षीय सासऱ्याचा हृदयविकाराच्या धक्‍क्‍याने मृत्यू झाला. त्यामुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. 

दरम्यान, सून कोरोनाबाधित असल्याने त्यांच्या सासऱ्यांचा अंत्यविधी कऱ्हाड येथील स्मशानभूमीत कोविडच्या नियमानुसार करण्यात आला. 

(संपादन ः संजय साळुंखे)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()