तारळे (सातारा) : परदेशातील क्युबेक विद्यापीठात (Quebec University) पेशी व रेणू जीवशास्त्र विषयात येथील डॉ. किरण तोडकर (Dr. Kiran Todkar) यांनी पीएच. डी. (Ph.D.) मिळवली आहे. यापूर्वी येथील तिघांनी डॉक्टरेट मिळविली आहे. डॉ. तोडकरही त्यांच्या पंक्तीत आले आहेत. त्यामुळे तारळ्याच्या शिरपेचात पुन्हा मानाचा तुरा रोवला आहे. (Dr. Kiran Todkar Have Obtained Ph.D. Degree From Quebec University Satara Marathi News)
परदेशातील क्युबेक विद्यापीठात पेशी व रेणू जीवशास्त्र विषयात येथील डॉ. किरण तोडकर यांनी पीएच. डी. मिळवली आहे.
डॉ. किरण यांचे वडील जगदीश तोडकर हे येथील व्यापारी आहेत. डॉ. किरण यांचे प्राथमिक व माध्यमिक शिक्षण जिल्हा परिषदेच्या व श्री छत्रपती हायस्कूलमध्ये झाले. कऱ्हाडला महाविद्यालयीन, सातारला पॉलिटेक्निकमध्ये डिप्लोमा फार्मसी, कऱ्हाडच्याच शासकीय औषध निर्माण महाविद्यालयात पदवी घेतली. 2005 ला त्यांनी स्वीडन गाठले. तेथे स्कोब्दे विद्यापीठात "मास्टर इन मॉलुकुलर बायोलॉजी'मध्ये (Master in Molecular Biology) शिक्षण घेतले. पाच वर्षे रिसर्च असिस्टंट म्हणून फ्रीबर्ग (स्वित्झर्लंड) Switzerland येथे कार्य केले.
त्यानंतर पुणे येथील राष्ट्रीय विज्ञान प्रयोगशाळेत दोन वर्षे कार्य केले. हंगेरी, दक्षिण कोरियात शैक्षणिक पदव्या संपादन केल्या. अंतिम ध्येय पीएच. डी. करण्याचे असल्याने क्वीन एलिझाबेथ शिष्यवृत्तीअंतर्गत क्युबेक विद्यापीठ ट्रायोरिव्हर्स येथे पाच वर्षे पीएच. डी. अभ्यासक्रमास सुरवात केली. त्यांना डॉक्टरेट मिळाल्याची घोषणा नुकतीच झाली. अंतिम वर्षात "पार्किन्सन्स' या मेंदू विकारावरील संशोधन जगप्रसिद्ध नेचर या नियतकालिकात प्रसिध्द झाले होते. विशेष म्हणजे जगभरातून आलेल्या 60 हजार शोधनिबंधांतून डॉ. किरण यांच्या शोधनिबंधाची निवड झाली आहे.
तारळेकरांसाठीही गौरव
डॉ. किरण यांच्या गुणवत्तेची व अभ्यासूवृत्तीची दखल परदेशी विद्यापीठांनीही घेतली आहे. त्यांच्या पीएच. डी. वर "एक्सलंट' शेरा आहे, प्रा. मार्क जर्मन यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी यश संपादन केले आहे. त्यांची पत्नी श्वेतादेखील याच विद्यापीठात उच्च रक्तदाब विषयावर पीएच. डी. करीत आहेत.
खरिपासाठीच्या कर्जाचे उद्दिष्ट बॅंकांनी पूर्ण करावे : पालकमंत्री पाटील
Dr. Kiran Todkar Have Obtained Ph.D. Degree From Quebec University Satara Marathi News
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.