हुबळी : अनेकांना शेती करायची म्हटलं की, जीवावर येतं; पण अशी काही माणसं आहेत, जी आपली नोकरी सांभाळत शेती पिकवतात आणि त्यातून भरघोस उत्पादनही घेतात. मग, त्यात क्लासवन अधिकारी (Classone Officer) देखील असतील. अशा बऱ्याच जणांना शेतीत रस असतो, तर काही जणांना शेती करायचा कंटाळा येतो. मात्र, हुबळीतील अशी एक व्यक्ती आहे, जी आपल्या क्लासवन पदाचा राजीनामा (Resigns) देऊन शेती व्यवसायाला नव्याने सुरुवात केलेय. (Dr. Prakash Hubli Leaved His College Principal Designation For Agriculture Karnataka Positive News)
अनेकांना शेती करायची म्हटलं की, जीवावर येतं; पण अशी काही माणसं आहेत, जी आपली नोकरी सांभाळत शेती पिकवतात आणि त्यातून भरघोस उत्पादनही घेतात.
आपल्या पत्नीच्या सेंद्रिय शेतीने (Organic Farming) प्रभावित होऊन अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या (College of Engineering) प्राचार्यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला. डॉ. प्रकाश हुबळी (Dr. Prakash Hubli) असं त्या प्राचार्यांचं नाव आहे. डॉ. हुबळी यांनी आपली नोकरी सोडताच शेतीचा मार्ग पत्करला आणि त्यातून त्यांनी भरघोस उत्पादन मिळवायला सुरुवात केली. सध्या हे दाम्पत्य सेंद्रिय शेतीतून पिकवलेला भाजीपाला ग्राहकांच्या ऑर्डरीनुसार, सहीसलामत त्यांच्या घरी पोहोच करतो. ह्या भाज्या एका पिशवीत पॅक करुन त्याची ऑर्डरीनुसार विक्री करतात.
डॉ. प्रकाश हुबळी हे पूर्वी बी. व्ही. भोमरडी अभियांत्रिकी महाविद्यालयात (B. V. Bhoomaraddi College Of Engineering & Technology Hubli Karnataka) प्राध्यापक होते. नंतर त्यांनी तोंडदारिया अभियांत्रिकी महाविद्यालयात (Tondadaria College of Engineering) प्राचार्याची भूमिका बजावली आणि तेथून त्यांनी आपला राजीनाम देत शेती करण्याचा निर्णय घेतला. त्यांच्या पत्नी कुसुमा हुबळी यांनी सेंद्रिय शेतीत रस घेतल्यामुळे ते प्रभावित झाले आणि या जोडप्यानं अभियांत्रिकी महाविद्यालय सोडण्याचा निर्णय घेतला. या दाम्पत्यानं कलघाटगी तालुक्यातील हिंडसगेरी गावात 4 एकर क्षेत्रात भाजीपाला पिकवून सेंद्रिय शेती करण्यास सुरवात केलीय.
हुबळीसह अन्य शहरात असणाऱ्या रहिवाशांकडून ऑनलाइन आणि व्हॉट्सअॅपव्दारे (Online and WhatsApp) ऑर्डरी स्वीकारुन ग्राहकांच्या घरी ताजा भाजीपाला पोहोचवण्याचं काम दाम्पत्यांकडून चोख होत आहे. भाजीपाला पोहोचवताना कोणत्याही घटकाचा अथवा रोगाचा प्रादुर्भाव होऊ नये, यासाठी भाज्या पिशवीमध्ये पॅक करुन त्या सुरक्षितरित्या घरी पोहचवल्या जात आहेत. त्यांनी पिकवलेल्या शेतात एकूण 55 विविध प्रकारच्या भाज्या, 40 जातीच्या घरगुती आणि 15 विदेशी भाजीपाल्यांचे उत्पादन होत आहे. लागवडीपासून ते कापणीपर्यंत पिकांचं पालनपोषण व संवर्धन पूर्णपणे सेंद्रिय पद्धतीत केलं जात आहे. त्यामुळे त्यांच्या भाजीपाल्याला बाजारपेठेत चांगलाच भाव आहे.
भुईमूग खत, कडुनिंब औषधी वनस्पती, कडुलिंबाचे तेल, कीटक व्यवस्थापन औषध या अशा विविध प्रकारच्या औषधांची निर्मितीही त्यांच्याव्दारे केली जात आहे. हे सर्व करत असताना त्यांना फलोत्पादन उपसंचालक काशिनाथ भद्रुणवर, वरिष्ठ सहाय्यक संचालक महांतेश पट्टनशेट्टी, सहाय्यक फलोत्पादन अधिकारी के. व्ही. अंगडी यांचं वेळोवेळी मार्गदर्शन लाभत आहे. राष्ट्रीय फलोत्पादन अभियानच्या माध्यमातून त्यांनी हा व्यवसाय सुरु केला असून यातून त्यांची चांगलीच बरकत होत आहे. सध्या मोबाईल आणि सोशल नेटवर्किंगचा कसा वापर करायचा हे त्यांनी सुरु केलेल्या त्यांच्या कृतीतून स्पष्ट होत आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून त्यांनी ग्राहकांसाठी घरपोहोच भाजीपाला सुविधा उपलब्ध केली असून या त्यांच्या संकल्पनेचं सर्वत्र कौतुक होत आहे.
Dr. Prakash Hubli Leaved His College Principal Designation For Agriculture Karnataka Positive News
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.