आधी बेड मिळत नसे आता पाण्याअभावी कोरोनाबाधितांचे हाेताहेत हाल

याबाबत कार्यकारी अभियंता श्री. मुंढे यांनी सांगितले की, हांगे यांच्या विहिरीवर कृषिपंपाचे कनेक्‍शन देण्यासंदर्भात काही तांत्रिक अडचणी आहेत. त्यांनी कृषिऐवजी कोविड सेंटरसाठी कनेक्‍शन अशी मागणी करणे अपेक्षित आहे. समक्ष पाहणी करण्यासाठी सहायक अभियंता श्री. कलशेट्टी यांना सूचना दिल्या आहेत.
drinking water shortage
drinking water shortagesystem
Updated on

कातरखटाव (जि. सातारा) : मागील आठवड्यात नव्याने सुरू झालेल्या पडळ (ता. खटाव) येथील कोरोना सेंटरच्या (corona care center) रुग्णालयात गेले दोन दिवस पाण्याचा तुटवडा जाणवत असल्याने रुग्णांबरोबर अधिकारी, कर्मचारी तसेच नातेवाईकांचे मोठ्या प्रमाणावर हाल होत आहेत. (drinking water shortage padal corona care center satara marathi news)

पडळ येथील आरोग्य विभागाच्या नूतन इमारतीत सुमारे 70 बेडचे कोविड रुग्णालय सुरू करण्यात आले आहे. त्यापैकी सध्या 35 ते 40 रुग्ण उपचार घेत आहेत. या सेंटरसाठी जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष प्रदीप विधाते यांच्या सूचनेस मान देत सामाजिक कार्यकर्ते प्रकाश हांगे यांनी स्वत:च्या विहिरीतील पाणी दिले होते. कानकात्रे तलावानजीक बसारा शिवारात असलेल्या या विहिरीस अद्याप वीज कनेक्‍शन नाही. आत्तापर्यंत पडळ येथील साखर कारखान्याचा जनरेटर वापरून पाणीउपसा केला जात होता. मात्र, काही कारणास्तव कारखान्याने जनरेटर इतरत्र हलविला आहे. त्यामुळे गेले दोन दिवस या विहिरीतील पाणीपुरवठा बंद झाला आहे. श्री. हांगे यांनी वीज कनेक्‍शन मिळण्यासंदर्भात योग्य ती प्रक्रिया केली आहे. परंतु, वीज कंपनीचे अधिकारी तांत्रिक अडचणी सांगत कनेक्‍शन देण्यास टाळाटाळ करत आहेत. अशा स्थितीत तहसीलदार, गटविकास अधिकारी व वीज कंपनीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून आणीबाणीच्या परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन तातडीने कनेक्‍शन देण्याची मागणी होत आहे.

drinking water shortage
'मराठे पाठीमागून वार करत नाहीत, समाेरुन करतात'
drinking water shortage
लस येताच सिव्हीलला नागरिकांची धाव; कोव्हॅक्‍सिन अत्यल्प

याबाबत कार्यकारी अभियंता श्री. मुंढे यांनी सांगितले की, हांगे यांच्या विहिरीवर कृषिपंपाचे कनेक्‍शन देण्यासंदर्भात काही तांत्रिक अडचणी आहेत. त्यांनी कृषिऐवजी कोविड सेंटरसाठी कनेक्‍शन अशी मागणी करणे अपेक्षित आहे. समक्ष पाहणी करण्यासाठी सहायक अभियंता श्री. कलशेट्टी यांना सूचना दिल्या आहेत.

विहिरीवर कनेक्‍शन देण्यासंदर्भात गटविकास अधिकारी रमेश काळे यांनी तहसीलदार किरण जमदाडे यांच्याकडे प्रस्ताव सादर केला आहे. ही प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत टॅंकरने पाणीपुरवठा सुरू करण्याबाबत संबंधित विभागास सूचना देण्यात आल्या आहेत.

- डॉ. युन्नुस शेख, तालुका वैद्यकीय अधिकारी, खटाव

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.