फास्ट टॅग स्कॅन न झाल्याने आनेवाडी टोलनाक्यावर वाहनचालकाला मारहाण

आनेवाडी टोलनाका येथील प्रकार; विरमाडेतील दहा जणांवर भुईंज पोलिसांत गुन्‍हा
anewadi toll booth
anewadi toll boothsakal
Updated on

सातारा : आनेवाडी येथील टोलनाक्‍यावर(anewadi toll booth) फास्‍ट टॅग(fast tag) स्‍कॅन न झाल्‍याच्‍या कारणावरून सोमवारी मध्‍यरात्री नालासोपारा येथील वाहनचालकास मारहाण केल्‍याप्रकरणी टोलनाका कर्मचाऱ्यासह विरमाडे (ता. वाई) येथील दहा जणांवर भुईंज पोलिस ठाण्‍यात (bhuinj police station)गुन्‍हा नोंदविण्‍यात आला आहे. नालासोपारा येथे मयुरेश भाऊसाहेब शेलार (वय २८) हे राहण्‍यास असून, ते काल रात्री १२ च्‍या सुमारास स्‍वत:च्‍या चारचाकीतून आनेवाडी टोलनाका येथे आले होते. याठिकाणी असणाऱ्या लेनमधून कार नेत असताना शेलार यांनी चारचाकीस असणारा फास्‍ट टॅग स्‍कॅन केला. मात्र, तो स्‍कॅन झाला नाही.

anewadi toll booth
मालाच्या विक्रीसाठी शेतकऱ्यांची वणवण

फास्‍ट टॅग स्‍कॅन(fast tag) न झाल्‍याने त्‍याठिकाणी असणारे टोल कर्मचारी व शेलार यांच्‍यात किरकोळ वाद झाला. वादाचे पर्यावसन नंतर हाणामारीत होण्‍यास सुरुवात झाली. त्‍याठिकाणी असणाऱ्या किरण बाबूराव सोनावणे (रा. विरमाडे), सचिन अशोक जाधव व इतर दहा जणांनी शेलार यांना शिवीगाळ व धक्काबुक्की सुरू केली. याचदरम्‍यान त्‍यांनी शेलार यांच्‍यासह चारचाकीत असणाऱ्या निमिष नरेंद्र चव्‍हाण, प्रथमेश चंद्रकांत घोसाळकर, विठ्ठल भागोजी धुमाळे, दुर्वेश नारायण गिरासे (सर्व रा. नालासोपारा) (anewadi toll booth)यांना मारहाण केली.याची तक्रार शेलार यांनी भुईंज पोलिस ठाण्‍यात नोंदवली असून, दहा जणांवर गुन्‍हा नोंदविण्‍यात आला आहे. याचा तपास हवालदार भोसले हे करीत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.