दिवाळीच्या तोंडावर कराडकरांचं आरोग्य धोक्यात? पगार न मिळाल्यामुळं कर्मचाऱ्यांनी उपसलं संपाचं हत्यार, शहरात तब्बल 8 टन कचरा पडून

शहरात एकही घंटागाडी न पोचल्याने तब्बल आठ टन कचरा तसाच पडून होता.
Employees Health Department of Karad Municipality
Employees Health Department of Karad Municipalityesakal
Updated on
Summary

कचरा न उचलल्यामुळे कचरा तसाच पडून आहे.

कऱ्हाड : दिवाळी तोंडावर (Diwali Festival) येवूनही दोन महिने पगार न मिळाल्याने कऱ्हाड पालिकेच्या (Karad Municipality) आरोग्य विभागाचे पावणे दोनशे कंत्राटी कर्मचारी आजपासून बेमुदत संपावर गेले आहेत. दोन महिन्यांचा पगार मिळाला नाही. पीएफही नीट भरत नाही. वारंवार सांगूनही ठेकेदार याकडं दुर्लक्ष करत असल्यामुळे कर्मचाऱ्यांनी आज संपाचे हत्यार उपसले आहे.

शहरात एकही घंटागाडी न पोचल्याने तब्बल आठ टन कचरा तसाच पडून होता. तब्बल १८ घंटागाड्या, पाच ट्रक्टर शहरात कचरा गोळ करतात. त्यापैकी एकही गाडी आज जागची हालली नाही. आंदोलनकर्ते कर्मचारी सकाळीच आज कचरा डेपोवर जमले. महिलांसह कर्मचाऱ्यांनी संबंधित कंत्राटी ठेकेदाराकडं पगार मागितला होता. तो न दिल्याने आजपासून ते बेमुदत संपावर गेले आहेत.

Employees Health Department of Karad Municipality
Gram Panchayat Election : ग्रामपंचायत निवडणुकीत भानामतीचा प्रकार; गावच्या वेशीवर ठेवल्या काळ्या बाहुल्या

कऱ्हाड पालिकेने नागरी भागातील घरगुती व व्यावसायिकांचा कचरा गोळा करून तो कचरा डेपोवर नेणे व तेथे त्यावर प्रक्रिया करून तो पुन्हा वापरात आणण्यासाठी एनडीके नावाच्या कंपनीला निविदा दिली आहे. त्या कंपनींतर्गत १७५ कंत्राटी कर्मचारी आहेत. वेगवेगळ्या शिफ्टमध्ये त्यांचे काम चालते.

Employees Health Department of Karad Municipality
आता अवयवदान करणाऱ्या व्यक्तीवर होणार शासकीय इतमामात अंत्यसंस्कार; आरोग्य विभाग महत्त्वाचा प्रस्ताव आणण्याच्या तयारीत!

त्या कर्मचाऱ्यांचा पगार दोन महिन्यांपासून देण्यात आलेला नाही. शिवाय, त्यांच्या पीएफमध्येही रक्कम जमा करताना टाळटाळ होत आहे. त्या सगळ्यांचा परिणाम म्हणून पालिका कंत्राटी कर्मचाऱ्यांनी आजपासून बेमुदत संपाचे हत्यार बाहेर काढले आहे. त्यामुळे शहरात मोठी गैरसोय झाली आहे. कचरा न उचलल्यामुळे कचरा तसाच पडून आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()