कोयना धरण परिसरात भूकंपाचा सौम्य धक्का

कोयना धरण परिसरात भूकंपाचा सौम्य धक्का
Updated on

कोयनानगर (जि. सातारा) : कोयना धरण परिसरात शनिवारी रात्री भूकंपाचा सौम्य धक्का बसला. त्याचा रिश्टर स्केल 2.8 इतका होता. त्याचा केंद्र बिंदू कोयनानगरपासून 20 किलोमीटरला वारणा खोऱ्यात जावळे गावाजवळ असल्याचे प्रशासनाने कळविले.

काेयना धरण परिसरात सातत्याने भूकंपाचे धक्के जाणवू लागले आहेत. गेल्या काही दिवसांपासून साैम्य धक्के जाणवत असले तरी ग्रामस्थांमध्ये भितीचे वातावरण पसरते. शनिवारी रात्री सुमारे 9 वाजून 38 मिनीटांनी भूकंपाचा साैम्य धक्का बसला. त्याची खोली आठ किलोमीटर खोल हाेती.

सातव्या राणीच्या कथित पुत्राने दाखविले सात तारे; व्यावसायिकाला सव्वा कोटीचा गंडा 

या धक्क्याने कोयनानगर व पाटण परिसर हादरला आहे. धक्क्याने कोणतीही जिवीत अथवा वित्त हानी झालेली नाही, असे तहसीलदार कार्यालयातून सांगण्यात आले.

संपादन : सिद्धार्थ लाटकर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.