Satara Crime : मेडिकल दुकानासमोर पिपाणी वाजवली म्‍हणून आठ वर्षाच्या मुलाला अंगावर वळ उठेपर्यंत बेदम मारहाण

कपडे विक्रेत्याच्या मुलाने वडिलांकडून एक पिपाणी मागून घेतली होती.
Satara Crime News
Satara Crime Newsesakal
Updated on
Summary

ही माहिती समजल्यावर वडिलांनी मुलाला शहर पोलिस ठाण्यात नेले.

सातारा : पिपाणी वाजवत (Pipani Instrument) असल्याच्या कारणावरून आठ वर्षांच्या मुलाला एका मेडिकल दुकानदाराने बेदम मारहाण केली आहे. जखमी मुलाला उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

Satara Crime News
Kolhapur Crime : धक्कादायक! मुलगा होत नसल्याने सासरच्या नातेवाईकांकडून छळ; विवाहितेची गळफास घेऊन आत्महत्या

गुरुवार परजावर काल (सोमवार) सायंकाळी ही घटना घडली. गणेशोत्सवाची (Ganeshotsav) लगबग असल्यामुळे एक कापड विक्रेता आज सायंकाळी गुरुवार परज परिसरात कपडे विक्री करत बसलेला होता. त्याचा आठ वर्षांचा मुलगा त्याच्या सोबतच होता.

Satara Crime News
Sangli Police : ड्यूटीवरून घरी परतल्यानंतर सांगलीतील पोलिसाची गळफास घेऊन आत्महत्या; काय आहे कारण?

गणेशोत्सवात फिरायला आलेली मुले विविध खेळणी किंवा वाद्य विकत घेऊन वाजवत जात असतात, त्यामुळे कपडे विक्रेत्याच्या मुलाने वडिलांकडून एक पिपाणी मागून घेतली होती. वडील कपडे विकत होते, त्या जवळच एक मेडिकल दुकान आहे. तो मुलगा त्या मेडिकलजवळ पिपाणी वाजवत होता.

Satara Crime News
मोठी बातमी! आता राज्य सरकार ग्रामपंचायतींना देणार दारू विक्रीच्या परवान्याचे अधिकार; प्रत्येक गावांत उघडणार दारूचे दुकान?

याचा राग मनात धरून संबंधित मेडिकल दुकानदाराने त्या मुलाला पाठलाग करून अंगावर वळ उठेपर्यंत बेदम मारहाण केली. ही माहिती समजल्यावर वडिलांनी मुलाला शहर पोलिस ठाण्यात नेले. पोलिसांनी त्याला उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यास सांगितले आहे. रात्री उशिरापर्यंत याबाबत शहर पोलिस ठाण्यात नोंद झाली नव्हती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.