कऱ्हाड (सातारा) : सातारा व सांगली जिल्ह्यातील राजकीयदृष्ट्या महत्वाच्या यशवंतराव मोहिते कृष्णा सहकारी साखर कारखान्याच्या (Yashwantrao Mohite Krishna Sahakari Sugar Factory) पंचवार्षिक निवडणुकीचा (Election) कार्यक्रम आज सायंकाळी जाहीर झाला. कारखान्यासाठी उद्यापासून (ता. 25) अर्ज भरण्यास सुरूवात आहे. कारखान्याचे 29 जूनला मतदान तर एक जुलैला मतमोजणी आहे. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून जिल्हा उपनिबंधक प्रकाश आष्टेकर (Prakash Ashtekar) यांची यापूर्वी नियुक्ती झाली आहे. कऱ्हाडचे उपनिबंध मनोहर माळी, कोरेगावचे संजय सुद्रिक व महाबळेश्वरचे जे. पी. शिंदे सहायक निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून काम पाहणार आहेत. (Election Of Yashwantrao Mohite Krishna Sahakari Sugar Factory Declared Satara Political News)
सातारा व सांगली जिल्ह्यातील राजकीयदृष्ट्या महत्वाच्या यशवंतराव मोहिते कृष्णा सहकारी साखर कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणुकीचा कार्यक्रम आज सायंकाळी जाहीर झाला.
जिल्हा निबंधक आष्टेकर यांनी कृष्णाच्या निवडणूक प्रक्रिया सुरू करण्याचा प्रस्ताव निवडणूक प्राधिकरणाकडे दिला होता. त्याला आज सायंकाळी मंजुरी मिळाली आहे. त्यामध्ये उद्यापासून (मंगळवारपासून) अर्ज भरण्यास सुरूवात होणार आहे. शासकीय सुट्टीचे दिवस वगळून अर्ज भरण्यास परवानगी आहे. त्यामुळे उद्याचा मंगळवार, त्यानंतर गुरूवार, शुक्रवार व पुढचा सोमवार व मंगळवार असे मोजके पाचच दिवस अर्ज भरण्याची मुदत आहे. त्यानंतर दोन जून रोजी छाननी आहे, तीन ते 17 जूनपर्यंत अर्ज माघारीची मुदत आहे. अंतिम यादी 18 जूनला जाहीर होणार आहे. त्यानंतर 29 जूनला मतदान तर 1 जुलैला मतमोजणी होणार आहे.
सातारा व सांगली जिल्ह्यातील पाच तालुक्यांचे कार्यक्षेत्रातील कृष्णा कारखान्याच्या सभासदांच्या पक्क्या याद्या मेच्या पहिल्या आठवड्यात झाल्या. त्यात 47 हजार 160 सभासदांची अंतिम यादी जाहीर झाली. अक्रियाशील 820 सभासदांचा यादीत समावेश आहे. कऱ्हाड, वाळवा तालुक्यात सर्वाधिक सभासद आहेत. कृष्णाचे निवडणूक निर्णय अधिकारी आष्टेकर यांनीही दिलेल्या प्रस्तावत फेरबदल करून निवडणूक प्राधिकरणाने कार्यक्रम जाहीर केला. श्री. आष्टेकर म्हणाले, कृष्णा कारखान्याच्या निवडणुकीचा कार्यक्रम आज जाहीर झाला आहे. त्यासाठी उद्यापासून (मंगळवार) अर्ज भरण्यास प्रारंभ आहे. त्यानंतर छाननी, अर्ज माघारीनंतर अंतिम यादी जाहीर होईल. मतदान 29 तर 1 जुलैला मतमोजणी आहे.
Election Of Yashwantrao Mohite Krishna Sahakari Sugar Factory Declared Satara Political News
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.