Tree Cutting : पुणे-बंगळूर राष्ट्रीय महामार्गाच्या सहापदरीकरणात अकरा हजार झाडांवर कुऱ्हाड

पुणे-बंगळूर राष्ट्रीय महामार्गाच्या शेंद्रे ते पेठनाका एकूण ६७ किलोमीटर पट्ट्यात सहापदरीकरणाच्‍या कामाला संबंधित कंत्राटदाराने कामांना प्रत्यक्ष सुरुवात केली आहे.
Tree Cutting
Tree CuttingSakal
Updated on
Summary

पुणे-बंगळूर राष्ट्रीय महामार्गाच्या शेंद्रे ते पेठनाका एकूण ६७ किलोमीटर पट्ट्यात सहापदरीकरणाच्‍या कामाला संबंधित कंत्राटदाराने कामांना प्रत्यक्ष सुरुवात केली आहे.

मलकापूर - पुणे-बंगळूर राष्ट्रीय महामार्गाच्या शेंद्रे ते पेठनाका एकूण ६७ किलोमीटर पट्ट्यात सहापदरीकरणाच्‍या कामाला संबंधित कंत्राटदाराने कामांना प्रत्यक्ष सुरुवात केली आहे. या कामावेळी सहापदरीकरणात महामार्गालगतच्या तब्बल १० हजार ८८० झाडांची कत्तल करावी लागणार आहे. मात्र, त्याबदल्यात नवीन ५५ हजार झाडे लावण्याची कंत्राटदाराची कमिटमेंट घेण्यात आली आहे.

शेंद्रे ते कागल या सुमारे दीडशे किलोमीटर पट्ट्याच्या सहापदरीकरणाच्या कामाला गतीने सुरुवात झाली आहे. त्यामधील शेंद्रे ते पेठनाका एकूण ६७ किलोमीटर पट्ट्यात सहापदरी कामाला संबंधित कंत्राटदाराने कामांना प्रत्यक्ष सुरुवातही केली आहे. पुणे-बंगळूर महामार्गावर मलकापूर शहरातील उड्डाणपुलासह इतर कामे वैशिष्ट्यपूर्ण ठरणार आहेत. कोयना नदी ते नांदलापूर या साडेतीन किलोमीटर पट्ट्यात नियोजित ५५० कोटींचा भव्य उड्डाणपूल होणार आहे.

वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी पुणे-बंगळूर महामार्गावर मलकापुरातील ११५ खांबांवर असलेल्या एकखांबी पुलाची रुंदी २९.५ मीटर आहे. त्याच्या खाली चार प्लस चार असे आठ आणि वर तीन प्लस तीन सहा असा एकूण १४ पदराचा महामार्ग या ठिकाणी तयार होणार आहे. हा पूल २० ते २२ महिन्यांत पूर्ण करण्याचा सहकंत्राटदारांचा प्रयत्न आहे.

या नवीन पुलामुळे कऱ्हाड ते मलकापूर सततच्या वाहतुकीच्या कोंडीची समस्या कायमस्वरूपी निकाली निघणार आहे. त्याचबरोबर शेंद्रे ते कागल या सुमारे दीडशे किलोमीटर पट्ट्यातील सहापदरीकरण वैशिष्ट्यपूर्ण होणार आहे. मात्र या एकूणच कामात सध्या महामार्गालगत असलेली तब्बल १० हजार ८८० झाडे तोडावी लागतील. त्याच्या बदल्यात नवीन ५५ हजार झाडे ठेकेदार लावून देणार असल्याचा करार करण्यात आल्याची अधिकृत सूत्रांकडून माहिती मिळाली आहे.

कंत्राटदार शब्द पाळणार का?

कोणत्याही रस्त्याचा विकास म्हटलं, की पहिल्यांदा त्या रस्त्यालगतच्या झाडांवर गंडांतर येते. शेंद्रे ते पेठ नाका यादरम्यान अकरा हजार झाडांची कत्तल सुरू आहे. त्या बदल्यात ५५ हजार झाडे लावण्याचा शब्द कंत्राटदाराने दिला आहे. यापूर्वीचे अनेक रस्ते झाले. मात्र, संबंधित कोणत्याच कंत्राटदाराने शब्द पाळले नाहीत. त्यामुळे नागरिक व पर्यावरण प्रेमींमध्ये नाराजी आहे. सध्‍याचा ठेकेदार हा शब्द पाळणार का? असा सवाल नागरिक करत आहे.

संबंधित कंत्राटदार झाडे लावणार कुठे, त्याचा पाठपुरावा कोण करणार, त्यावर नियंत्रण कोणाचे राहणार अशा शंका पर्यावरणप्रेमी व नागरिक व्यक्त करत आहेत. मात्र, झाडे न लावल्यास कंत्राटदाराला हिसका दाखवण्याचा इशाराही नागरिकांनी व पर्यावरणप्रेमींनी दिला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.