राज्यात सक्षम लोकायुक्त कायदा करा; न्यासाची प्रशासनाकडे मागणी

लोकपाल लोकायुक्त कायद्यासाठी देशभर जनआंदोलन करण्यात आले
Satara
SataraSakal
Updated on

सातारा : लोकपाल (Lokpal) लोकायुक्त कायद्यासाठी देशभर जनआंदोलन करण्यात आले. यामुळे लोक निर्भय बनले. यानंतर जानेवारी (January) १९१४ मध्‍ये केंद्रात लोकपाल कायदा मंजूर झाला. मात्र, महाराष्ट्रात (Maharshtra) सक्षमपणे लोकायुक्त कायदा होणे आवश्यक आहे. असे असताना सरकार चालढकल करत आहे. त्यामुळे तत्काळ लोकायुक्त कायदा करावा, अशी मागणी अण्णा हजारेप्रणित भ्रष्टाचार विरोधी जनआंदोलन न्यासच्या वतीने करण्यात आली आहे.

Satara
कऱ्हाड-चिपळूण रेल्वे मार्गाला गती द्या! निवेदन सादर

याबाबतचे निवेदन निवासी उपजिल्हाधिकारी सुनील थोरवे यांना देण्यात आले आहे. न्यासाच्या वतीने निवदेनात म्हटले की, केंद्रीय लोकपाल लोकायुक्त कायद्यातील तरतुदीनुसार लोकपाल कायदा लागू झाल्यापासून एक वर्षाच्या आत सर्व राज्यांत लोकपालच्या धर्तीवर लोकायुक्त कायदा करावा, अशी तरतूद आहे. ज्या महाराष्ट्रातून लोकपाल कायद्याचे आंदोलन सुरू झाले, त्याच महाराष्ट्रात अजून कायदा झालेला नाही. ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्या नेतृत्वाखाली त्यासाठी सातत्याने प्रयत्न सुरू आहेत. यासाठी कार्यरत असलेल्या मसुदा समितीचे काम अंतिम टप्प्यात असून, अजूनही गतिमानता नाही. आता कोरोना कमी झाला असून राज्य सरकार मात्र, त्याकडे दुर्लक्ष करत आहे. सरकार बैठका घेण्याकडे जाणूनबुजून टाळाटाळ करत आहे. दरम्यान, जिल्ह्यात अहिंसेच्या मार्गाने आंदोलन करण्यात येणार असल्याचा इशाराही न्यासचे जिल्हाध्यक्ष संदीप जगताप यांनी दिला आहे.

Satara
समाजाचे सत्व हरवले; कार्यकर्ते कसे निर्माण होणार? - प्रा. डॉ. मिलिंद जोशी

या वेळी सत्वशील शेळके, मिलिंद कासार, चंद्रशेखर सोनार, संतोष यादव, अनिल शिंदकर, बापू शेळके, अविनाश खुस्पे, दादासाहेब घोलप, फिरोज कच्छी, कृष्णात शेळके, चांदगणी आत्तार, तात्या सावंत आदी उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.