Shivaji Maharaj Statue : आता आसाममध्येही शिवरायांचा पुतळा

साताऱ्यातील एका सुपुत्राने जम्मू काश्मिरात भारतीय सैन्य दलाच्या केंद्रात सर्वप्रथम उभारलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्यानंतर आता दुसऱ्या एका अशाच सुपुत्राने आसाममध्ये सैन्य दलाच्या केंद्रात छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा उभारला आहे.
Shivaji Maharaj Statue
Shivaji Maharaj Statue sakal
Updated on

कोरेगाव, (जि. सातारा) : साताऱ्यातील एका सुपुत्राने जम्मू काश्मिरात भारतीय सैन्य दलाच्या केंद्रात सर्वप्रथम उभारलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्यानंतर आता दुसऱ्या एका अशाच सुपुत्राने आसाममध्ये सैन्य दलाच्या केंद्रात छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा उभारला आहे. त्याचे नुकतेच अनावरण झाले.

भोसे (ता. कोरेगाव) येथील लेफ्टनंट कर्नल अमित विजय माने यांनी पुढाकार घेत आपल्या सहकाऱ्यांसह जम्मू काश्मिरात कुपवावाड्यामध्ये ४१ राष्ट्रीय रायफल्स (मराठा लाईट इन्फंट्री) बटालियनमध्ये सात नोव्हेंबर २०२३ रोजी छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा उभारला. त्याचे अनावरण राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार आदींनी तेथे समारंभपूर्वक केले. त्‍याप्रमाणेच छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल सार्थ अभिमान बाळगणाऱ्या नागठाणे (ता. सातारा) येथील रविराज नलवडे यांनी पुढाकार घेत आसाममध्ये सैन्य दलाच्या केंद्रामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा उभारला आहे.

चीनच्या सीमेलगत आसाममधील जोरहाट येथे भारतीय सैन्य दलाच्या २१ पॅरा स्पेशल फोर्स मराठा २१ युनिटचे कमान अधिकारी कर्नलपदी रविराज नलवडे हे कार्यरत आहेत. त्यांनी व ईशान्य सीमेवर संरक्षणार्थ तैनात असलेल्या मराठासह इतर युनिटमधील अधिकारी, जवानांनी एकत्र येत शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा उभारण्याचा संकल्प केला होता.

त्यानुसार सर्वांनी स्वनिधीमधून पुतळा आणून, संरक्षक दलाची परवानगी वगैरे बाबी पूर्ण करून युनिटमध्ये शिवाजी महाराजांचा पुतळा उभारला. पुतळ्याचे अनावरण नुकतेच लेफ्टनंट कर्नल हरजितसिंग साही यांच्या हस्ते झाले.

Shivaji Maharaj Statue
Ramdas Athawale : ४०० जागा जिंकणे अवघड नाही : आठवले

आसाममध्ये उभारलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्यामुळे भारतीय सैन्य दलात कार्यरत अधिकारी, जवानांना जशी प्रेरणा मिळते, तद्वतच पुतळ्यामुळे शत्रूवरही कायम दहशत राहील.

- हरजितसिंह साही, लेफ्टनंट जनरल

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()