कोल्हापूरला खंडपीठ स्थापन करा ; श्रीनिवास पाटील

मुंबई उच्च न्यायालयाच्या खंडपीठाचे सर्किट बेंच कोल्हापूर येथे व्हावे
Establish a bench at Kolhapur Shriniwas Patil
Establish a bench at Kolhapur Shriniwas Patilsakal
Updated on

कऱ्हाड :(Satara News) मुंबई उच्च न्यायालयाच्या खंडपीठाचे सर्किट बेंच कोल्हापूर येथे व्हावे अशी मागणी खासदार श्रीनिवास पाटील(Shriniwas Patil) यांनी केंद्रीय कायदा व न्याय मंत्री किरेन रिजिजू यांच्याकडे केली आहे. कोल्हापूरला सर्किट बेंचसाठी अनेक वर्षापासून मागणी होत आहे. त्या पार्श्वभूमीवर खासदार पाटील यांनी दिल्ली येथे केंद्रीय मंत्री रिजिजू यांची भेट घेतली. त्यासंदर्भात त्यांच्याशी सविस्तर चर्चा करून त्यांनी आग्रही मागणी केली आहे.(Circuit bench at Kolhapur)

Establish a bench at Kolhapur Shriniwas Patil
..त्यावेळी अजित पवार सत्तेत होते का? BJP आमदार, NCP नेत्यांत कलगीतुरा

खासदार पाटील म्हणाले, मुंबई उच्च न्यायालयाच्या खंडपीठाचे सर्किट बेंच कोल्हापूर येथे स्थापन करावे अशी मागणी होत आहे. मुंबई उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर खंडपीठ कृती समितीने सर्किट बेंचच्या स्थापनेबाबत वारंवार पाठपुरावा केला आहे. सर्किट बेंच स्थापनेनंतर सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर, रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यातील नागरिकांना त्याचा फायदा होणार आहे.(Bombay High Court repeatedly pursued the establishment of a circuit bench)

Establish a bench at Kolhapur Shriniwas Patil
विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक कशी होणार?

त्या जिल्ह्यातील नागरिकांना उच्च न्यायालयाशी संबंधित कामासाठी मुंबईला जावे लागते. त्याकरिता सुमारे ३०० ते ४५० किलोमीटर लांबून प्रवास करावा लागतो. त्यामुळे त्यांचा वेळ व पैसा अनावश्यक खर्च होत असतो. कोल्हापूर येथे सर्किट बेंच स्थापन झाल्यास शेजारील जिल्ह्यातील दोन कोटींहून अधिक लोकांना याचा फायदा होईल. त्यामुळे सर्किट बेंच स्थापन होणे गरजेचे असून त्यासाठी प्रयत्न करावेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.