सातारा ः प्रजासत्ताकदिनी कोविड योद्ध्यांचा गौरव करण्यासह समस्त नागरिकांच्या तंदुरुस्तीबाबत प्रबोधन करण्यासाठी एका माजी सैनिकाने आपल्या 11 वर्षांच्या मुलासमवेत येथील पोवई नाक्यावरील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यापासून धावत जाऊन सायगाव (धामणेर, ता. कोरेगाव) येथे ग्रामपंचायतीचे ध्वजवंदन केले. माजी सैनिक नीलेश गोगावले यांच्या या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे.
श्री. गोगावले यांना सामाजिक कार्याची आवड असून, ते नेहमीच समाजाची बांधिलकी जपत असतात. तसेच आरोग्य आणि तंदुरुस्तीबाबत ते सतत जागरुक असतात. नागरिकांनीही नेहमी तंदुरुस्त राहण्यासाठी व्यायामाकडे लक्ष द्यावे, आपले आरोग्य जपावे याबाबत ते प्रबोधन करतात. नुकतेच सर्वांवर कोरोनाचे मोठे संकट ओढवले होते. त्या काळात आपल्या स्वतःच्या जिवाची पर्वा न करता अनेक आशा वर्कर, ग्रामसेवक, आरोग्य कर्मचाऱ्यांनी कोरोना रुग्णांची आणि समस्त नागरिकांची सेवा केली. त्या कोरोना योद्ध्यांचा सन्मान करण्यासाठी श्री. गोगावले यांनी प्रजासत्ताकदिनी सातारा ते रहिमतपूर असा धावण्याचा उपक्रम राबविण्याचे ठरविले.
येथील पोवई नाक्यावरून सकाळी सहा वाजता त्यांनी धावण्यास प्रारंभ केला. त्यांच्यासमवेत त्यांचा 11 वर्षांचा मुलगा आदिनन सायकलवरून रपेट करत होता. नगरसेवक अल्लाउद्दीन शेख यांनी शुभेच्छा दिल्या. मजल दरमजल करत ते सायगाव येथे पोचले. तेथे ग्रामपंचायतीचे ध्वजवंदन केले. त्यावेळी झालेल्या कार्यक्रमात श्री. गोगावले यांनी तेथील आशा वर्कर, ग्रामसेवक, आरोग्य कर्मचाऱ्यांचा सत्कार केला. श्री. गोगावले यांच्या या उपक्रमाचे ग्रामस्थ आणि जिल्ह्यातील मान्यवरांनी कौतुक केले. तसेच ग्रामस्थांनी श्री. गोगावले यांचा सत्कारही केला.
कऱ्हाडात खुल्या प्रवर्गाचे 120 गावांत आरक्षण; शुक्रवारी होणार सरपंचपदाची सोडत!
राष्ट्रपतींच्या गिफ्टने खासदार श्रीनिवास पाटील गेले भारावून
सातारा : कुळ कायद्यातील अवैध विक्री झालेल्या जमिनी होणार सरकारजमा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.