देशसेवा आली फळाला! माजी सैनिकाकडून सापडलेल्या नोटांचे बंडल प्रामाणिकपणे परत

नागठाण्यात माजी सैनिकाने रस्त्यात सापडलेली रोख रक्कम संबंधितास प्रामाणिकपणे परत केली.
500 Rupees
500 Rupeesesakal
Updated on

नागठाणे (सातारा) : सध्याच्या काळात प्रामाणिकपणा हा शब्द दुरापास्त होत असताना येथील माजी सैनिकाने रस्त्यात सापडलेली रोख रक्कम संबंधितास परत केली. या आदर्श कृतीचे विशेष कौतुक होत आहे. (Ex-soldier Honestly Returned The Money Found On The Street At Nagthane Satara Marathi News)

हणमंत गणपती चंदुगडे (Hanmant Ganpati Chandugade) असे या माजी सैनिकाचे नाव आहे. लष्करी सेवा यशस्वीपणे बजावून सुभेदार मेजर या पदावरून ते निवृत्त झाले. गावातील बाजारपेठ रस्त्यावरून जाताना सोसायटीसमोर त्यांना 500 रुपयांच्या नोटांचे बंडल सापडले. ती रक्कम मोजली असता 16 हजार रुपये भरली. त्यानंतर हे पैसे घेऊन थेट ग्रामपंचायत कार्यालयात गेले. ही रक्कम ज्याची असेल त्यांनी ओळख पटवून घेऊन जावे, असे आवाहनही त्यांनी केले.

500 Rupees
महाराजसाहेब.. आम्हाला न्याय द्या; SEBC च्या शिष्टमंडळाचे उदयनराजेंना साकडे

दरम्यान, गावातीलच व्यावसायिक गणेश नलवडे यांना याविषयीची माहिती मिळाली. गडबडीत त्यांच्याजवळील ही रोख रक्कम रस्त्यात पडली होती. काही वेळातच ते ग्रामपंचायत कार्यालयात पोचले. प्रत्यक्ष शहानिशा केल्यानंतर ही रक्कम नलवडे यांचीच असल्याचे स्पष्ट झाले. त्यानंतर चंदुगडेंनी ही रक्कम नलवडेंना सुपूर्द केली. या वेळी सरपंच डॉ. रूपाली बेंद्रे, उपसरपंच अनिल साळुंखे, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते मधुअण्णा खुळे उपस्थित होते हणमंत चंदुगडे यांच्या प्रामाणिकपणाचे ग्रामपंचायत पदाधिकारी तसेच ग्रामस्थांनी कौतुक केले.

दहा रुपयांची नोट पडली तरी माणसाला त्याची हुरहुर वाटत राहते. इथे तर मोठी रक्कम होती. ती संबंधितापर्यंत पोच करता आली, याचा अगदी मनापासून आनंद वाटतो.

-हणमंत गणपती चंदुगडे, माजी सैनिक

निराधार, कष्टकऱ्यांसाठी 'आई'चा आधार, भुकेल्यांसाठी भरविला जातोय मायेनं 'आहार

Ex-soldier Honestly Returned The Money Found On The Street At Nagthane Satara Marathi News

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.